नगर : मी भाजपचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे.मला जे सांगितले ते मी करतो.मला मंत्रिपद मिळावं ही कार्यकर्त्यांची इच्छा होती. मात्र,मी नाराज असायचा प्रश्न नसल्याचे मत भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी व्यक्त केले. पार्टीनं जे दिलं ते मला मान्य आहे. आता मी धनगर समाजासाठी (Dhangar samaj) पूर्णपणे काम करणार आहे. धनगर समाजाला प्रतिनिधित्व मिळावे,अशा कार्यकर्त्यांच्या भावना होत्या. पण मी देवाभाऊंच्या सोबत आहे. कार्यकर्त्यांनी याचं भान राखावं असेही पडळकर म्हणाले.
नक्की वाचा : ‘आमचं शेत नांगरायची वेळ आली तेव्हा बैलासकट गडी घेऊन गेले – सदाभाऊ खोत
‘पक्षाने जे मला दिलं आहे ते मान्य’ (Gopichand Padalkar)
माझ्या चेहऱ्यावरुन तुम्हाला मी नाराज दिसतो का? असा सवाल देखील पडळकरांनी केला. मी संत बाळू मामा यांच्या दर्शनासाठी गेलो होतो. इथे आल्यावर मी पहिल्यांदा तुमच्याशी बोलतोय असे पडळकर म्हणाले. पक्षाने जे मला दिलं आहे,ते मान्य असल्याचेही गोपीचंद पडळकर यावेळी म्हणाले. मारकडवाडीचं आंदोलन भोवल्याचा काही प्रश्न नाही,असेही ते म्हणाले. मंत्रीमंडळ प्रश्न मला काही जास्त महत्त्वाचा वाटत नाही, त्यामुळे मी बोलणार नाही असेही पडळकर म्हणाले.
अवश्य वाचा : मोठी बातमी!रविचंद्रन अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
भुजबळांना मंत्रिपद न मिळाल्यानं ओबीसी समाजात संताप (Gopichand Padalkar)
छगन भुजबळ हे वरिष्ठ नेते आहेत. ज्यावेळी ओबीसी समाजाचा विषय आला,तेव्हा कोणीच पुढे येत नव्हते. पण भुजबळ हे पुढे आल्याचे गोपीचंद पडळकर म्हणाले. भुजबळ यांना मंत्रिपद मिळाले नाही. त्यामुळे ओबीसी समाजात तीव्र संताप आहे.पण तो माझ्या पार्टीचा विषय नसल्याचे पडळकर म्हणाले. राम शिंदे यांना जे पद मिळणार आहे त्याबाबत मी त्यांचे अभिनंदन करतो,असेही पडळकर म्हणाले. मी जी भूमिका घेऊन काम करतोय ती भूमिका मी अजिबात बदलणार नाही, विधीमंडळात नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे पडळकर म्हणाले. ज्यांच्या सोबत माझी दुश्मनी आहे त्यांच्या सोबत माझी दुश्मनी कायम राहील,असेही पडळकर म्हणाले. देवा भाऊ आणि माझे वेगळे नाते आहे, असंही त्यांनी स्पष्ट केले.