Gorakshnath Gad : नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) तालुक्यातील आदर्श गाव मांजरसुंबा येथे गोरक्षनाथ गडावर (Gorakshnath Gad) बुधवार (ता. २६) रोजी महाशिवरात्री (Mahashivratri) निमित्त हजारो भाविकांनी दर्शन घेतले. पंचक्रोशीतील मांजरसुंबा, वांबोरी, कात्रड, ससे गांधले वस्ती, पाची महादेव वस्ती, मोरेवाडी, गुंजाळे देहरे, डोंगरगण, पिंपळगाव माळवी येथील भाविक प्रवरा संगम येथील कावडीने पाणी आणून पहाटे चार ते सात या वेळेत गोरक्षनाथांच्या मुर्तिचा जलाभिषेक करण्यात आला.

नक्की वाचा : पुणे हादरलं!स्वारगेट बस डेपोत २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार
जिल्हा नियोजन अधिकारी यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा
यावेळी देवस्थानच्या वतीने कावडींचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यानंतर जिल्हा नियोजन अधिकारी यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा करण्यात आली. महाशिवरात्रीनिमित्त मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष शंकरराव कदम, सचिव गोरक्षनाथ कदम, उपसरपंच जालिंदर कदम, जयराम कदम, सागर कदम, इंद्रभान कदम, चंद्रभान कदम आदीसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अहिल्यानगर शहरापासून २२ किमी. अंतरावर नगर-वांबोरी रोडवर डोंगरगण या तिर्थक्षेत्राच्या पश्चिमेस मांजरसुंबा (गोरक्षनाथ) गड हे नुकतेच महाराष्ट्र राज्याच्या आदर्श गाव योजनेत समाविष्ट झालेले एक गाव आहे. मांजरसुंबा गावापासून सुमारे 3 किमी. अंतरावर चैतन्य गोरक्षनाथाचे सुमारे ८०० वर्षापूर्वीचे प्राचीन असे जुने गुहेसारखे मंदिर होते. मंदिर मोडकळीस आल्याने मंदिराच्या जिर्णोध्दाराचे काम सन १९९९ पासून नाथभक्तांच्या तसेच मांजरसुंबा ग्रामस्थांच्या पुढाकाराने सुरु करण्यात आलेले असून हे बांधकाम जुन्या काळातील दगडी घडीव टिचीव तोडीमध्ये पूर्ण करुन मंदिराचे संपूर्ण काम पूर्ण झालेले आहे.

अवश्य वाचा : राजकारण हे नेहमी समाजाच्या हिताचे असावे : बाळासाहेब थोरात
महाराष्ट्र व राज्याबाहेरुन दर्शनासाठी लाखो लोक येतात (Gorakshnath Gad)
योगी गोरक्षनाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेले ठिकाण असून या ठिकाणी अन्नदानाला अतिशय महत्व आहे. हे ठिकाण नाथभक्तांचे एक जागृत ठिकाण असून दरवर्षी महाराष्ट्र तसेच राज्याबाहेरुन लाखो लोक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. योगी गोरक्षनाथांनी या पवित्र ठिकाणी देवदेवतांना अन्नदान केल्याने ती परपंरा भाविकांनी कायम ठेवलेली आहे. या ठिकाणी गोरक्षनाथ देवस्थानच्या वतीने तसेच भाविकांच्या देणगीतून नित्य अन्नदान चालू आहे. तसेच या ठिकाणी प्रत्येक श्रावण महिन्यात महिनाभर हजारो भाविक येऊन अन्नदान करतात, असे देवस्थानच्या वतीने सांगण्यात आले. महाशिवरात्रीनिमित्त वांबोरी, नगर येथील भाविकांतर्फे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
