Government Employees : संपाबाबत सरकारी कर्मचाऱ्यांची माघार; येत्या बुधवारी ठरवणार पुढील दिशा

Government Employees : संपाबाबत सरकारी कर्मचाऱ्यांची माघार; येत्या बुधवारी ठरवणार पुढील दिशा

0
Government Employees

Government Employees : नगर : बेमुदत संपावर (Indefinite strike) जाण्यावरून सरकारी कर्मचारी (Government Employees) आणि अधिकाऱ्यांच्या संघटनेत मतभेद असल्याचे चित्र नुकतेच समोर आले. राजपत्रित अधिकारी संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्याशी चर्चेनंतर संप स्थगित केला; मात्र २९ ऑगस्टपासून संपावर जायचे की नाही याबाबतचा निर्णय कर्मचारी संघटना बुधवारी (ता. ४) घेणार आहे.

नक्की वाचा: बनावट सोन्याचे बिस्कीट देत फसवणूक करणारा गजाआड

४ सप्टेंबरच्या बैठकीनंतर दिशा ठरवण्यात येणार

राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती महाराष्ट्र राज्यातर्फे २९ ऑगस्टपासून पुकारण्यात आलेल्या बेमुदत संप राज्य सरकारच्या विनंतीवरुन तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. ४ सप्टेंबरच्या बैठकीनंतर पुढील निर्णय व दिशा ठरवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा समन्वय समितीचे निमंत्रक रावसाहेब निमसे व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी दिली आहे.

अवश्य वाचा: दीपक केसरकरांच्या वक्तव्यावरून संजय राऊत भडकले; म्हणाले …

मुख्यमंत्र्यांनी केली विनंती (Government Employees)

राज्य सरकारने दिलेल्या आश्‍वासनानूसार सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा शासन निर्णय निर्गमीत होण्यासाठी २९ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय समन्वय समितीने घेतला होता. त्या अनुषंगाने राज्यातील सर्व कर्मचारी, शिक्षकांमध्ये संपावर जाण्यासाठी उत्स्फूर्त तयारी दर्शवली होती. मुख्यमंत्र्यांनी समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलावले असता निमंत्रक विश्‍वास काटकर यांनी स्पष्टपणे सांगितले की, आपण केंद्र सरकार ने जाहीर केलेल्या युपीएस पेन्शन योजना राज्यात लागू करण्याच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त करीत मागील बेमुदत संपाच्या पार्श्‍वभूमीवर विधानसभेत जाहीर केल्याप्रमाणे सुधारीत निवृत्ती वेतन योजना शासन निर्णय प्रसिद्ध होत नाही, तोपर्यंत बेमुदत संप मागे घेतला जाणार नसल्याचा समन्वय समितीचा निर्णय झाला असल्याचे सांगितले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान यांचा दौरा व इतर कार्य व्यस्ततेमुळे आपल्या बरोबर चर्चा होऊ शकली नाही. आपल्या मागणीवर मी सहमत आहे, परंतु, या संदर्भात संबंधितांशी आवश्‍यक चर्चा करण्यासाठी चार दिवसांचा अवधी द्यावा, तोपर्यंत बेमुदत संप मागे घेण्याची विनंती केली.


मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विनंतीचा प्रस्ताव व झालेली चर्चा या विस्तारित समन्वय समितीची ऑनलाइन बैठक मंगळवारी (ता. २७) सर्व घटक संघटनेचे प्रमुख नेते व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे पदाधिकाऱ्यांसमवेत पार पडली. यामध्ये चर्चा होऊन ४ सप्टेंबर रोजी समन्वय समितीची विस्तारित ऑनलाइन बैठक घेऊन मधील काळात शासनाचा प्रतिसाद व प्रगती व प्रत्यक्ष झालेले निर्णय आणि शासनाच्या भूमिकेच्या अनुषंगाने या बैठकीत समन्वय समिती बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. समन्वय समितीच्या पुढील आंदोलनाची दिशा व निर्णय ४ सप्टेंबरच्या बैठकीनंतर कळविण्यात येणार आहे. गरज भासल्यास यापेक्षा जास्त ताकदीने संघर्ष करण्याची तयारी समन्वय समितीने दर्शवली आहे.