नगर: राज्यातील शासकीय रुग्णालयातील (Government Hospital Charges) आरोग्य विभागाने विविध वैद्यकीय सेवांसाठी एक निश्चित शुल्क (A fixed fee for medical services) आकारण्याचा शासन निर्णय जारी केला होता. मात्र यावरून मोठा वाद झाला. या वादावर पडदा टाकत सरकारने अनावधानाने परिपत्रकात दरांचा उल्लेख केला,अशी चुक कबूल केली (The government admitted its mistake) आहे. त्यानंतर नव्याने पत्रक काढून शासकीय रुग्णालयात मोफतच उपचार (Free treatment in government hospitals) होतील,असं स्पष्ट केले आहे.
नक्की वाचा: सरकारी हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार आता बंद;केस पेपरपासून शस्त्र क्रियेपर्यंत द्यावे लागणार ‘एवढे’पैसे
सरकारने दिलेल्या स्पष्टीकरणात नेमकं काय ? (Government Hospital Charges)

सरकारने आता या दरपत्रकाबद्दल स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे की, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखालील शासकीय रुग्णालयामध्ये तपासणी व उपचार हे आरोग्य विभागाच्या २३ ऑगस्ट २०२३ च्या शासन निर्णयानुसार, निशुल्क करण्यात आलेले आहेत. ते आजही पूर्वीप्रमाणेच नि:शुल्क आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाने १६ जानेवारी २०२६ ला प्रसिद्ध केलेल्या नागरिकांच्या सनदेमधील परिशिष्ठ-तीन मध्ये सेवा सुविधा पुरविण्यासाठी ६ जून २०१५ च्या शासन निर्णयातील शासन मान्य दर नजरचुकीने समाविष्ट झाले. प्रत्यक्षात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखाली शासकीय रुग्णालयामध्ये तपासणी व उपचार निःशुल्क करण्यात आलेले असल्याने नागरिकांच्या सनदेमधील परीशिष्ठ-तीन हे ९ फेब्रुवारी २०२६ च्या शुध्दीपत्रकातून वगळण्यात आले आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.
अवश्य वाचा: राहुरी नगरपरिषदेचा मोठा ठराव;दीड तास मोबाईलसह मनोरंजनांची माध्यमे राहणार बंद
काय आहे प्रकरण? (Government Hospital Charges)
१६ जानेवारी २०२६ रोजी सरकारने नागरिकांची सुधारित सनद प्रसिद्ध केली होती. त्यात वैद्यकीय उपचारांचे दर वाढल्याचे नमूद केले. त्यातून सरकारी रुग्णालयात यापुढे मोफत उपचार बंद होणार, अशी माहिती समोर आली. यावरून बराच वाद उभा राहिला. ग्रामीण भागातील लोक आजही मोठ्या प्रमाणात सरकारी रुग्णालयाचा लाभ घेतात.ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर राज्यातील गोरगरिब जनता आणि गरजू रुग्णांमध्ये संतापाची लाट पसरली होती. त्यानंतर तातडीने या प्रकाराची दखल सार्वजनिक विभागाकडून घेण्यात आली. त्यानंतर अनवधानाने हे दर छापल्याची कबुली शासनाने दिली.



