
Government of Maharashtra : नगर : सालाबाद प्रमाणे जैन धर्मियांचे (Jainism) पर्युषण महापर्व २० ऑगस्ट २०२५ पासून संपूर्ण देशात साजरे केले जाते आहे. जैन समाजाच्या वतीने मिशन सेफ विहार ग्रुपचे अध्यक्ष इंजी. यश प्रमोद शहा यांनी महाराष्ट्र शासन (Government of Maharashtra) आदेश तसेच ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया (Animal Welfare Board of India) यांचे याबाबतचे परिपत्रक जोडून निवेदन ईमेल द्वारे पाठवून अहिल्यानगर जिल्हा प्रशासन यांना शासन आदेश प्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्यातील पर्युषण महापर्व निमित्त दरवर्षी प्रमाणे प्रथम दिवशी आणि शेवटच्या दिवशी २७, २८ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्व कत्तलखाने आणि सर्व प्रकारचे मांस विक्री केंद्र बंद ठेवण्यात यावे या बाबत विनंती केली होती.
नक्की वाचा : मनोज जरांगे पाटील बुधवारी अहिल्यानगरमधून जाणार
जिल्हा प्रशासनाचे आदेश
त्याला अनुसरून महाराष्ट्र शासन आदेश प्रमाणे दरवर्षी प्रमाणे अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाने २७, २८ ऑगस्ट रोजी याबाबत बंद ठेवण्याबाबतचे आदेश पारित केले आहे. प्रशासनाने याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक, महापालिका आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, उपविभागीय दंडाधिकारी सर्व, जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका शाखा, तहसीलदार तथा कार्यकारी अधिकारी यांना परिपत्रकानुसार योग्य ती कार्यवाही आणि अंमलबजावणी करण्याबाबतचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
आवश्य वाचा : रंधा धबधबा येथे होणार काचेचा पूल
संबंधित विभागास केल्या सूचना (Government of Maharashtra)
अहिल्यानगर महापालिका तसेच जिल्हा पोलीस प्रशासनाने देखील शासन आदेशानुसार योग्य ती कार्यवाही आणि अंमलबजावणी करण्याबाबत करण्याच्या सूचना संबंधित विभागास केल्या आहेत. शहा यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पशुसंवर्धन विभाग, प्रभाग अधिकारी या सर्वांशी संपर्क करत शासन आदेश नुसार योग्य ती कार्यवाही आणि अंमलबजावणी करण्यासाठी संबंधितांना सूचना कराव्यात अशी विनंती देखील केली आहे. तसेच महाराष्ट्र शासन आदेशाची संपूर्ण राज्यातील सर्व जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यासाठी ईमेल मुख्यमंत्री कार्यालयास पाठवला आहे, तसेच कार्यालयाने पुढील कार्यवाहीसाठी संबंधित अधिकारी आणि विभागास पाठवला असल्याचे शहा यांनी सांगितले.