Government Schemes : नगर : महसूल महोत्सवानिमित्त (Revenue Festival) राहाता तालुक्यातील लोणी, खडकेवाके, बाभळेश्वर, पुणतांबा, अस्तगाव व पिंपळवाडी येथे आयोजित शिवछत्रपती समाधान शिबिर (Shiv Chhatrapati Samadhan Shibir) उत्साहात पार पडले. या शिबिरांमध्ये चारशेहून अधिक लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा (Government Schemes) थेट लाभ देण्यात आला.
नक्की वाचा : भारताचा इंग्लंडवर थरारक विजय; कसोटी मालिका २-२ ने बरोबरीत
शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांनी व्यक्त केले समाधान
लोणी येथील मुख्य शिबिरात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी जिंवत सातबारा मोहीम, वारस नोंदी, संजय गांधी निराधार अनुदान योजना, ॲग्रीस्टक योजना, उत्पन्न व जात दाखले वाटप आदी उपक्रम राबविण्यात आले. शासनाच्या या उपक्रमामुळे शेतकरी, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक सेवा एकाच ठिकाणी मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
अवश्य वाचा : पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध: विखे पाटील
समाधान शिबिरांना उत्तम प्रतिसाद (Government Schemes)
या शिबिरास शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, तहसीलदार अमोल मोरे, नायब तहसीलदार हेमंत पाटील, बाळासाहेब मुळे व मंडळाधिकारी, तलाठी, कर्मचारी उपस्थित होते. महसूल विभागाच्या पुढाकारामुळे गावागावात शासकीय सेवा पोहोचत असून समाधान शिबिरांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे.