नगर : कोल्हापूर येथील कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरण (Comrade Govind Pansare Murder Case) हे राज्यात मोठ्या प्रमाणात गाजलं होतं. आता या प्रकरणासंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. यातील संशयित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, अमोल काळे आणि शरद कळसकर यांना कोल्हापूर (Kolhapur) येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) सर्किट बेंचकडून जामीन मंजूर (Bail Granted) झाला आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी आजपर्यंत एकूण १२ संशयित आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यापैकी ९ जणांना यापूर्वीच जामीन मंजूर झाला होता.
नक्की वाचा: पुण्यात मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याची दारु पिऊन सहा गाड्यांना धडक
वीरेंद्र तावडे,अमोल काळे आणि शरद कळसकर यांना जामीन मंजूर (Govind Pansare)
मात्र, या प्रकरणातील डॉ. वीरेंद्र तावडे, अमोल काळे आणि शरद कळसकर या तिघांना जामीन मंजूर झाला नव्हता. जामीन न मिळाल्यामुळे तिघेही कळंबा कारागृहात होते. आज (ता. १४) तिघांच्याही जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापुरातील सर्किट बेंच इथं सुनावणी झाली. यामध्ये तिघांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केलाय. त्यामुळे कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आजपर्यंतचे एकूण सर्वच 12 संशयीतांना आता जामीन मंजूर झाला आहे.
अवश्य वाचा: सोन्याची रेकॉर्डब्रेक भरारी! १० ग्रॅम सोन्याचा आजचा दर किती?
हिंदुत्वनिष्ठांची साडे नऊ वर्षांची भरपाई कोण करणार? (Govind Pansare)
आता पानसरे हत्याकांडातील या तिघांनाही जामीन मंजूर झाल्यानंतर या मुद्दयांवर बोट ठेवत सनातन संस्थेने निरपराध हिंदुत्वनिष्ठांची साडे नऊ वर्षांची भरपाई कोण करणार ? असा सवाल केला आहे. पानसरे हत्याप्रकरणी निष्पाप हिंदुत्वनिष्ठ डॉ. वीरेंद्र तावडे, अमोल काळे आणि शरद कळसकर यांना जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे.