Grain Festival : नगर : “पौष्ठिक तृणधान्यांची (Grain Festival) उत्पादन क्षमता आपल्या जिल्ह्यात उत्तम आहे. शेतकऱ्यांना याचा अधिकाधिक उपयोग करावा लागेल, जेणेकरून त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि विविध पोषण समस्यांवर मात केली जाऊ शकते”, असे प्रतिपादन अहिल्यानगर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (Agricultural Officer) सुधाकर बोराळे यांनी केले आहे. तसेच, विविध तृणधान्यांचा वापर आहारात कसा करावा आणि त्याचे आरोग्यदायक फायदे काय आहेत, याबाबत माहिती दिली.
नक्की वाचा : चालकाच्या रागामुळे चार निष्पापांचा गेला बळी
महोत्सवात तृणधान्यांच्या उपयोगाबद्दल माहिती देण्यात आली
जिल्ह्यातील कृषी विभागातर्फे जिल्हास्तरीय पौष्ठिक तृणधान्य महोत्सवाचे शनिवारी (ता.२२) राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या नानासाहेब पवार सभागृहात आयोजन करण्यात आले होते. महोत्सवात विविध तृणधान्यांच्या उपयोगाबद्दल माहिती देण्यात आली तसेच शेतकऱ्यांना पौष्ठिक तृणधान्यांच्या उत्पादनाचे महत्त्व सांगितले गेले. याप्रसंगी ते बोलत होते.
अवश्य वाचा : यंदाच्या वर्षी फक्त पहिलीच्या वर्गालाच सीबीएससी : दादा भुसे
पौष्ठिक तृणधान्यांचे उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर (Grain Festival)
डॉ. विजू अमोलिक विभाग प्रमुख वनस्पती शास्त्र विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी सांगितले की, “पौष्ठिक तृणधान्यांचे उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि तंत्रज्ञानाचे ज्ञान देणे अत्यंत आवश्यक आहे.” राजेंद्र सुपेकर उपविभागीय कृषी अधिकारी कर्जत यांनी जामखेड ज्वारी बद्दल माहिती दिली. तर विजय शिंदे शास्त्रज्ञ यांनी ज्वारी लागवड तंत्रज्ञान याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. डॉ. विक्रम कड यांनी तृणधान्य पिकावर प्रक्रिया करून तयार केल्या जाणाऱ्या उपपदार्थाबद्दल माहिती दिली. नेब्र्स्का अमेरिका येथून कार्यक्रमासाठी आलेले नेब्बलम यानी आंतर राष्ट्रीय बाजारपेठे मध्ये तृणधान्य पिकासाठी असलेल्या संधी बद्दल माहिती दिली. तर आशिष यांनी आर्टिफिशियल इंटेलीजन्स बद्दल मार्गदर्शन केले.
महोत्सवात शेतकऱ्यांनी विविध स्टॉल्स याना भेटी देवून माहिती घेतली.. (Grain Festival)
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पौष्ठिक तृणधान्यांच्या उत्पादनात उत्कृष्ट कार्य केलेल्या शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात आले. विद्यापीठ प्रक्षेत्रावर प्रत्यक्ष भेट देवून शेतकरी आणि अधिकार्यानी पिकाची पाहणी केली. श्रीरामपूर तालुका कृषी अधिकारी उल्हास राक्षे यांनी सूत्रसंचालन केले. श्रीरामपूरचे उपविभागीय कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी उपस्थितांचे आभार मानले.