Gram Panchayat : अकोलेतील १४६ ग्रामपंचायती झाल्या ऑफलाइन

संगणक परिचालकाने विविध मागण्यांसाठी बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे तालुक्यातील १४६ ग्रामपंचायती ऑफलाइन (Offline) झाल्या आहेत.

0
Offline : अकोलेतील १४६ ग्रामपंचायती झाल्या ऑफलाइन
Offline : अकोलेतील १४६ ग्रामपंचायती झाल्या ऑफलाइन

Gram Panchayat : अकोले : तालुक्यात सुमारे १४६ ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावागावात विकासाचा रथ सुरू आहे. शासनाने ग्रामस्थांना अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला इंटरनेट (Internet) जोडून विविध प्रकारचे दाखले व ग्रामपंचायत (Gram Panchayat) स्तरावरील नमुने ऑनलाइन (Online) करण्याचा प्रयत्न केला आहे. तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागात आजही इंटरनेटचा मोठा प्रश्न आहे. तरीही कसरत करून काम करीत आहे. मात्र, हे काम करणार्‍या संगणक परिचालकाला (computer operator) तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत असल्याने संगणक परिचालकाने विविध मागण्यांसाठी बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे तालुक्यातील १४६ ग्रामपंचायती ऑफलाइन (Offline) झाल्या आहेत.

हे देखील वाचा : राजीनाम्याच्या मागणीवर छगन भुजबळांचं सूचक विधान


अकोले तालुक्यातील १४६ ग्रामपंचायतींत ९१ संगणक परिचालक कार्यरत आहेत. ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या पूर्वीच्या ‘संग्राम’ व सध्याच्या ‘आपले सरकार’ सेवा केंद्र प्रकल्पात १२ वर्षांपासून ग्रामपंचायत स्तरावर ग्रामविकास विभागाने नेमून दिलेले काम संगणक परिचालक करीत आहेत. वर्षानुवर्षे शासन त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. ग्रामीण भागातील जनतेला विविध प्रकारच्या सेवा देण्याचे काम संगणक परिचालक अविरतपणे करीत आहेत. ग्रामपंचायतीचे ऑनलाइन-ऑफलाइन काम व इतर अनेक कामे प्रामाणिकपणे करूनही महागाईच्या काळात केवळ ६ हजार ९०० रुपये देण्यात येतात. यात कुटुंब कसे चालवायचे, असा प्रश्न उपस्थित करून मागण्या मान्य होईपर्यंत संप पुकारला आहे.

नक्की वाचा : शनिशिंगणापूर देवस्थानाला न्याय देऊ; चंद्रशेखर बावनकुळेंच्या आश्वासनानंतर उपाेषण मागे


संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्यात यावे. कर्मचारी दर्जा व किमान वेतन मिळेपर्यंत वीस हजार रुपये मासिक वेतन देण्यात यावे, नव्याने सुरु करण्यात आलेली चुकीची टारगेट सिस्टम रद्द करावी, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या जुन्या संगणक परिचालकांना नियुक्ती देऊन प्रलंबित मानधन त्वरीत द्यावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here