Gram Panchayat Election : नगर : ग्रामविकास विभागाने (Rural Development Department) मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीची तत्काळ प्रभाग रचनेची (Ward Structure) अधिसूचना मंगळवारी (ता. १७) रोजी जारी केली आहे. जिल्ह्यातील ७६५ ग्रामपंचायतीच्या (Gram Panchayat Election) प्रभाग रचनेला ७ एप्रिलपासून प्रारंभ होणार आहे.
नक्की वाचा : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीची तत्काळ प्रभाग रचना
नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद- पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तयारीमुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुका रखडल्या होत्या. अनेक ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रशासक धोरणात्मक विकास कामांचे निर्णय घेत नसल्याने विकास कामे रखडली होती. गावपातळीवर कार्यकर्ते ही निवडणुकीच्या प्रतिक्षेत होते. मात्र, ग्रामविकास विभागाने मंगळवारी (ता.१७) ग्रामपंचायत शाखेला मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीची तत्काळ प्रभाग रचना करण्याचा आदेश दिले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील ७६५ ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेला सुरुवात होणार आहे.
अवश्य वाचा : उच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतर 5 टक्के मुस्लिम आरक्षणाचा शेवट
तलाठी व ग्रामसेवक यांची संयुक्त स्थळ पाहणी (Gram Panchayat Election)
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेची मुदत ज्या महिन्यात संपत आहे, त्यापूर्वी सहा महिने संबंधित संस्थेच्या हद्दीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बदल करता येत नाही. त्यामुळे मुदत संपत आलेल्या ग्रामपंचायतीची तत्काळ प्रभाग रचना करण्याची सूचना देण्यात आली आहे. यानुसार तहसीलदारांनी गावाचा नकाशे करावा, तलाठी व ग्रामसेवक यांना संयुक्त स्थळ पाहणी करून प्रभाग, सीमा निश्चित करावी तसेच तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समितीला प्रारुप प्रभाग रचनेची तपासणी पूर्ण करण्याची सूचना देण्यात आली आहे.
ग्रामविकास विभागाने निश्चित केलेल्या कार्यक्रमानुसार २० फेब्रुवारी ते २३ एप्रिल दरम्यान नकाशे तयार करणे, प्रारुप प्रभाग रचना प्रस्ताव करणे, जिल्हाधिकारी यांची मान्यता घेणे, आवश्यक दुरुस्त्या करणे, निवडणूक आयोगाला प्रारुप आराखडा सादर करणे, आयोगाच्या सूचनांची दुरुस्ती करणे, प्रारुप रचनेची प्रसिद्धी करुन हरकरती, सूचना मागवणे, उपविभागीय अधिकारी यांच्यापुढे सुनावणी होऊन जिल्हाधिकारी यांना अभिप्राय सादर करणे आदी प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे.
प्रभाग रचनेचा कार्यक्रम
७ एप्रिल – प्रारुप प्रभाग रचना प्रसिद्ध
१३ एप्रिल – हरकती घेण्याची अंतिम तारीख
२१ एप्रिल – हरकती व सूचनांवर सुनावणी
२८ एप्रिल – अंतिम प्रभाग रचना निवडणूक आयोगास सादर
४ मे – अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होणार
तालुकानिहाय ग्रामपंचायत
अकोले – ५२
संगमनेर – ९४
कोपरगाव – २९
राहाता – २५
श्रीरामपूर – २७
राहुरी – ४४
नगर – ५९
पाथर्डी – ७८
शेवगाव -४८
कर्जत – ५६
जामखेड – ४७
पारनेर – ८८
श्रीगोंदे – ५९



