नगर : ग्रामपंचायत निवडणूक (Gram Panchayat Election Results) राजकीय पक्षाच्या निवडणूक चिन्हावर लढवली जात नसतानाही भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आपल्याच पक्षाला निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्याचा दावा सोमवारी केला. नगर जिल्ह्यातील १७८ ग्रामपंचायतींच्या सदस्य, सरपंच पदासाठी काल (साेमवार) मतमाेजणी हाेऊन निकालाचे आकडे बाहेर पडले आहे. राजकीय पक्षांच्या पुटीनंतर निवडणुका झालेल्या ग्रामपंचायतींवर राजकीय पक्षांनी दावा ठोकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ६०, तर भाजपने ९२ ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतच्या विजयावरून भाजप (BJP) व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वाधिक रस्सीखेच असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
हेही वाचा : Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंची एसटी संपाची हाक ठरली फोल; कर्मचाऱ्यांकडून अजिबात प्रतिसाद नाही
भाजपने एकूण ९२ ग्रामपंचायती जिंकल्याचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ग्रामपंचायतींत विजय मिळवल्याचा दावा केला आहे. भाजपने आतापर्यंत सर्वाधिक जागा जिंकल्याचे सांगत अनेक ग्रामपंचायत निवडणुकीत पक्ष पुढे असल्याचे सांगितले.
नगर जिल्ह्यातील १७८ ग्रामपंचायतींचे सदस्य व सरपंच पदासाठी रविवारी (ता. ५) मतदान झाले. १६ ग्रामपंचायती आधीच बिनविरोध झाल्या होत्या. सोमवारी (ता. ६) मतमोजणी होऊन निकालाची आकडेवारी बाहेर पडली. निकालाची आकडेवारी बाहेर पडताच राजकीय पक्ष सरसावले. त्यांनी ग्रामपंचायतीचे विजयी सदस्य व सरपंच आमच्याच पक्षाचे असल्याचा दावा केला. जिल्ह्यातील ६० ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) वर्चस्व असल्याचा दावा जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केला आहे. उत्तर नगर जिल्ह्यातील ९२ पैकी ४५ ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पक्षाची वर्चस्व असल्याचा दावा उत्तर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी केला आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक ९२ ग्रामपंचायतींवर भाजपने दावा ठाेकला आहे. काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने दावा केला आहे. काँग्रेसने संगमनेर, श्रीगोंदा आणि श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. शिवसेनेनेही नेवासा व नगर तालुक्यातील ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. त्यामुळे काेणकाेणत्या पक्षाचा आहे, याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप ६६, अजित पवार गट ४४, शरद पवार १९, काँग्रेस २०, उद्धव ठाकरे गट १५, इतर २७ एकनाथ शिंदे गट ३, अशा एकूण १९४ ग्रामपंचायतींवर सदस्य, सरपंच निवडून आल्याचा दावा केला जात आहे.