Gramsevak : कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाई करा : सोमनाथ कांडके

Gramsevak : कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाई करा : सोमनाथ कांडके

0
Gramsevak : कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाई करा : सोमनाथ कांडके
Gramsevak : कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाई करा : सोमनाथ कांडके

Gramsevak : नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील अनेक गरजूंना प्रधानमंत्री आवास योजने (PMAY) अंतर्गत घरकुल मिळावे यासाठी जिल्हा प्रशासनाने (District Administration) ग्रामसेवक यांमार्फत सेल्फ सर्वे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सर्वेची मुदत आज (ता.१५) संपली आहे. या सर्व्हेत ग्रामसेवकांच्या (Gramsevak) कामात दिरंगाई व हलगर्जीपणा दिसून आला आहे. त्यामुळे अनेक गरजूंना घरकुला पासून वंचित राहावे लागणार आहे.

नक्की वाचा : राज्यातील देवस्थानच्या जमिनींच्या खरेदी विक्री बंद; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

सेल्फ सर्वेसाठी पुन्हा मुदतवाढ द्यावी

त्यामुळे या सेल्फ सर्वेसाठी पुन्हा मुदतवाढ द्यावी व कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना (उबाठा) गटाचे युवासेना जिल्हा उपप्रमुख सोमनाथ कांडके यांनी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी युवा सेना तालुकाप्रमुख प्रवीण गोरे, संजय गांधी निराधार समिती सदस्य तथा ग्राम पंचायत सदस्य बाबासाहेब धीवर, महादेव दरंदले आदी उपस्थित होते.

अवश्य वाचा : राज्यात लाडक्या बहिणींच्या नावे शेकडो बनावट खाती,प्रकरण नेमकं काय ?

यावेळी कांडके म्हणाले, (Gramsevak)

प्रधानमंत्री घरकुल योजनेसाठी शासनाकडून अहिल्यानगर जिल्ह्यात ग्रामसेवक मार्फत व सेल्फसर्वे करण्यात आला. या सर्वेची मुदत १५  मे पर्यंत होती. परंतु ही योजना गावागावांमध्ये राबवत असताना, ग्रामसेवकांच्या कामकाजात हलगर्जीपणा दिसून आला. त्यामुळे स्वतःच्या मालकीच्या घरापासून वंचित असणाऱ्या गरजू लोकांपर्यंत ही योजना पोहोचलीच नाही. त्यासाठी ग्रामस्तरावर योजनेच्या माहितीसाठी ग्रामसेवकांनी व प्रशासनाने योग्य प्रचार-प्रसार करणे अपेक्षित होते. मात्र, तसे न झाल्याने लाभार्थी स्वतःच्या हक्काच्या पक्क्या घरापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे या या सर्व्हेला मुदत वाढ द्यावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.