
Ground Zero Teaser : बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी (Actor Emraan Hashmi) ‘ग्राउंड झिरो’ (Ground Zero) चित्रपटामुळे चर्चेत आहे. बऱ्याच काळापासून या चित्रपटाची प्रतीक्षा केली जात आहे. अखेर आज २८ मार्चला इमरानच्या ‘ग्राउंड झिरो’ चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित (Teaser Relese) झाला आहे. या टीझरमध्ये मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रीची झलक पाहायला मिळत आहे.
नक्की वाचा : ‘गुलकंद’ चित्रपटातील ‘चल जाऊ डेटवर’ हे रंगतदार गाणं प्रदर्शित
‘ग्राउंड झिरो’च्या टीझरमध्ये नेमकं काय ?(Ground Zero Teaser)
इमरान हाश्मीचा ‘ग्राउंड झिरो’ चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. २००१ मध्ये काश्मीरमध्ये घडलेली एक घटना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात इमरानने लष्करी अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. चित्रपटाच्या टीझरची सुरुवात अशांत वातावरणापासून सुरू होते. एका लष्करी अधिकाऱ्याची दिवसाढवळ्या आणि सार्वजनिक ठिकाणी गोळी घालून हत्या केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानंतर दहशतवाद्याचा आवाज येतो,“हिंदुस्तान के वजीर-ए-आलम सुन लें. कश्मीर की आजादी, एक ही मकसद। मोहम्मद इन्साफ करेगा”,असं या ठिकाणी टीझरमध्ये पाहायला मिळत आहे.
त्याच्यानंतर इमरान हाश्मी एका जीवघेण्या मिशनवर जाताना दिसत आहे.अखेर शेवटी एका बॉम्बस्फोटात तो जखमी होतो. तेव्हा इमरान एक डायलॉग म्हणतो, ज्यानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. “सिर्फ कश्मीर की जमीन हमारी है या यहां के लोग भी?” असं म्हणत इमरान काश्मीरमधील अशांत वातावरणाबद्दल प्रश्न उपस्थित करतो.
अवश्य वाचा : मोठी बातमी!केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्ता वाढवला!
गेल्या ५० वर्षांतील ‘बीएसएफ’चं सर्वांत मोठं मिशन ‘ग्राउंड झिरो’ चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. त्यामध्ये या मिशनचं नेतृत्व करणाऱ्या बीएसएफ डेप्युटी कमांडर नरेंद्र नाथ दुबे यांच्या भूमिकेत इमरान हाश्मी असणार आहे. पहिल्यांदाच इमरान लष्करी अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहे. तसेच इमरानसह मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरही या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ‘ग्राउंड झिरो’ चित्रपटाचं दिग्दर्शन तेजस देओस्कर यांनी केलं आहे. या चित्रपटात इमरान, सई यांच्याव्यतिरिक्त झोया हुसैन, मुकेश तिवारी, दीपक परमेश, ललित प्रभाकर, रॉकी रैना व राहुल वोहरा यांसारखे अनेक कलाकार मंडळी महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत.
२५ एप्रिलला प्रदर्शित होणार चित्रपट (Ground Zero Teaser)
‘ग्राउंड झिरो’ चित्रपटाच्या निर्मितीची धुरा कासिम जगमगिया, विशाल रामचंदानी, संदीप सी सिधवानी, अर्हाना बगाती, टॅलिसमॅन फिल्म्स, अभिषेक कुमार व निशिकांत रॉयने सांभाळली आहे. इमरान हाश्मीचा हा बहुप्रतीक्षित चित्रपट २५ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.