नगर : ‘चैत्र पाडवा’ म्हणजे मराठी नववर्षाचा पहिला दिवस!चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी देशभरामध्ये गुढीपाडव्याचा सण (Gudhipadava Festival) मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडव्याचा सण महाराष्ट्रात घरांवर गुढी उभारून साजरा केला जातो तर काही शहरांमध्ये या दिवशी चैत्र शोभायात्रा देखील काढली जाते.
नक्की वाचा : मोठी बातमी!राज्यातील ‘या’ लाडक्या बहिणींना आता दरमहा मिळणार फक्त ५०० रुपये
शिवाजी नाईकवाडी यांनी उभारली पुस्तकांची गुढी (Gudhipadawa 2025)
अनेकजण अनोख्या पद्धतीने हा गुढी पाडव्याचा सण साजरा करतात. मात्र अहिल्यानगर शहरांमध्ये असलेले सेवानिवृत्त बँक कर्मचारी शिवाजी नाईकवाडी यांनी त्यांच्या घरी अनोखी गुढी उभारली होती.शिवाजी नाईकवाडी यांनी वेगवेगळ्या दोन हजार पुस्तकांचा वापर करत ही गुढी (Book Gudhi) उभारली आहे.असं म्हंटलं जातं की,पुस्तकं सांगतात कथा, पुस्तकं मांडतात व्यथा, पुस्तकं जाणतात गाथा,भल्याबुऱ्या माणसांची.हीच बाब लक्षात घेऊन या नाईकवाडी परिवाराने ही पुस्तकांची गुढी उभारल्याचे दिसून आलं आहे.
अवश्य वाचा : सत्तेवर बसवलेले लोक आता राक्षसाप्रमाणे बोलू लागलेत;हर्षवर्धन सपकाळ यांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कोणकोणत्या पुस्तकांची उभारली गुढी (Gudhipadawa 2025)
नाईकवाडी यांनी उभारलेल्या गुढीमध्ये श्रीमद् भागवत सार, श्री ज्ञानेश्वरी, योगी कथामृत, भगवद्गीता, अब्दुल कलाम, मराठवाड्याचा विकास, साने गुरुजी, ध्यासपर्व, बालसंस्कार, भारताचे संविधान, शिवचरित्र, गौतम बुद्ध चरित्र यांसह अनेक सामाजिक, धार्मिक ग्रंथ आणि चरित्रांचा समावेश करण्यात आला आहे. तर गुढीवर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. या गुढी भोवती वाचाल तर वाचाल, झाडे लावा, झाडे जगवा,पुस्तके म्हणजे मन निर्मळ करणारा अविश्रांत झरा आहे, खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे,असे संदेश देणारे फलक देखील याठिकाणी लावल्याचे पाहायला मिळालं. एकंदरीतच दैनंदिन जीवन जगत असताना पुस्तके किती महत्वाची असतात, हेच या गुढीच्या निमित्ताने सांगण्यात आलं आहे. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.