Gudi Padwa: आदिवासी भागात गुढीपाडव्यानिमित्त गाठी-कडे बनवण्यास सुरुवात

Gudi Padwa: आदिवासी भागात गुढीपाडव्यानिमित्त गाठी-कडे बनवण्यास सुरुवात

0
Gudhi padva

Gudi Padwa : अकोले:  येत्या काही दिवसांवर होळी आणि गुढीपाडव्याचा (Gudi Padwa) सण आला आहे. राजूर (ता. अकोले) येथील व्यावसायिकांनी साखरगाठी तयार करण्यास प्रारंभ केला आहे. परंतु कच्च्या मालासह मजुरीचे दर (Rate) वाढल्याने अनेक व्यावसायिकांनी त्यातून माघार घेतली. परंतु, विक्रीचे भाव स्थिर राहणार असल्यामुळे मागणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.वर्षभरात येणाऱ्या प्रत्येक सणात वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे वेगळे महत्त्व असते. आदिवासी भागात होळी सणाला अनन्यसाधारण महत्व असल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात गाठी-कडे खरेदी केले जातात आणि गुढीपाडव्याचा सण (Festival) उन्हाळ्यात येत असल्याने शरीराला थंडावा मिळण्यासाठी साखरगाठीचे सेवन केले जाते. सध्या हे सण जवळ आल्याने साखरगाठी तयार करण्यास प्रारंभ झाला आहे.

नक्की वाचा : शिर्डीत दिवसाढवळ्या गोळीबार; आरोपी फरार

कमी नफ्यात विक्री (Gudi Padwa)


मात्र कच्चा माल व मजुरीचे दर दोनशेपासून चारशे रुपयांपर्यंत वाढल्याने या पारंपरिक व्यवसायाला कमी नफ्यात विक्री करावी लागत आहे. सध्या राजूर येथे अशोक पाबळकर, राम पन्हाळे, राजेंद्र चोथवे असे तीन ते चार साखरगाठी बनवण्याचे कारखाने आहे. एक क्विंटल साखरेपासून 90 किलो साखरगाठी तयार होते. यासाठी साखर, दूध पावडर, लाकडी साचे, दोरा, गाठीला पांढराशुभ्र रंग येण्यासाठी लिंबाचा वापर केला जातो.

हे देखील वाचा : भगव्या ध्वजाचा आचारसंहितेशी संबंध काय?; ‘शिवप्रतिष्ठान’च्या धारकऱ्यांचा सवाल

हाताने बनवलेल्या गाठ्यांना जास्त पसंती (Gudi Padwa)

लाकडी साच्यातून दोन क्विंटल साखरगाठी बनवण्यासाठी एक पूर्ण दिवस तीन मुख्य कारागीर आणि इतर दोन असे कामगार लागतात. किरकोळ दर 120 व घाऊक दर 90 रुपये आहे. बाजारात मशिनद्वारे बनवण्यात आलेल्या गाठ्या आल्या असतानाही ग्राहक हाताने बनवलेल्या गाठ्यांना जास्त पसंती देत आहेत. मात्र, खर्च वाढल्याने पारंपरिक पद्धतीने गाठीकडे बनवण्याचा व्यवसाय थंडावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here