Guerrilla Warfare : ‘गनिमी कावा’ युद्धतंत्राचे जनक छत्रपती शिवाजी महाराज

Guerrilla Warfare : 'गनिमी कावा' युद्धतंत्राचे जनक छत्रपती शिवाजी महाराज

0
Guerrilla Warfare : 'गनिमी कावा' युद्धतंत्राचे जनक छत्रपती शिवाजी महाराज
Guerrilla Warfare : 'गनिमी कावा' युद्धतंत्राचे जनक छत्रपती शिवाजी महाराज

Guerrilla Warfare : अहिल्यानगर : गनिम म्हणजे शत्रू व कावा म्हणजे डावपेच म्हणजे ‘गनिमी कावा’ याचा अर्थ शत्रूवर विजय मिळवण्यासाठी खेळलेले डावपेच किवा युद्धतंत्र. आपल्या पेक्षा ताकतवान शत्रूला जेरीस आणण्यासाठी, गुप्तपणे शत्रूवर हल्ले करण्यासाठी वापरावयाचे तंत्र म्हणजे गनिमी कावा!’ ‘गनिमी कावा’ (Ganimi Kava) या शब्दाला इंग्रजी प्रतिशब्द ‘गुरीला वॉर (Guerrilla Warfare) आहे. स्पॅनिश भाषेत युद्धाला ‘गर्रा (Guerra) म्हणतात. यावरुन ‘गुरीला वार’ हा शब्द तयार झाला. गनिमी युद्धतंत्र यशस्वी होण्यासाठी प्रामुख्याने खालील घटकांची आवश्यकता असते उच्च – ध्येय, प्रजेचा पाठिंबा, लोकप्रिय नेता, पक्का तळ, सुयोग्य भूप्रदेश व युद्धातील गतिमानता. आणि हे सर्व गुण छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये (Chhatrapati Shivaji Maharaj) होते.

नक्की वाचा : हिंदू धर्म विचाराची सत्ता महापालिकेवर बसविणार : संग्राम जगताप

जुलमी राजवटी नष्ट करुन् ‘श्रींचे हिंदवी स्वराज्य’ स्थापन

परकीय सत्ता झुगारून देणे ‌हे बरेच वेळा गनिमी युद्धाचे ध्येय असते. छत्रपती शिवाजीराजांनी तत्कालीन जुलमी राजवटी नष्ट करुन् ‘श्रींचे हिंदवी स्वराज्य’ स्थापन करण्याचे ध्येय जनतेसमोर ठेवले होते. डेव्हिड बेन – गुरीयन हा इस्रायलचा स्वातंत्रसेनानी म्हणतो “मातृभूमी भेट म्हणून दिली किंवा मिळवली जात नसते. विशेष अधिकार म्हणून किवा राजकीय सौदे बाजीमुळे ती प्राप्त केली जात नाही. ती सैन्याने विकत घेता येत नाही किंवा बळाने रोखता येत नाही. कदापी नाही! मातृभूमी हि निढळाच्या घामाने घडवलेली एक ऐतिहासिक निर्मिती असते. जनतेने पिढ्यानपिढ्या केलेल्या शरीरिक, मानसिक आणि नैतिक सामुहिक श्रमांचे ते फळ असते.”
गनिमी युद्धतंत्रात गतिमानतेला अत्यंत महत्व आहे. अशा युद्धातील गनिमांच्या हालचाली या फार चपळ हव्यात. जर हे गनिमी सैनिक गतिमान, चपळ नसतील तर त्यांचा पराभव होऊ शकतो. शिवाजी महाराजांनी या गतिमानतेला ओळखले होते. त्यांनी वेढा लावून गड जिंकण्याची पद्धत बदलून अधिक गतिमान केली. त्यांचे सैन्य नुसते वेढा घालून न बसता सरळ किल्ल्यावर चालून जात असे.

अवश्य वाचा : वांजोळीत दाणी वस्तीवर जबरी चोरी; चोरट्यांच्या मारहाणीत पती-पत्नी जखमी

शत्रूला दबावात ठेवणे हे गनिमी काव्याचे मुख्य तंत्र (Guerrilla Warfare)

सैनिकांच्या हालचाली अधिक चपळ होण्यासाठी राजांनी सैनिकांचा वेश बदलला. युद्धांमध्ये चपळ घोडदलाचा चलाखीने उपयोग करून घेतला. जेव्हा शत्रू बलशाली असतो त्यावेळी गनिमी सैन्य त्यांना टाळत असत. शत्रू जेव्हा अडचणीत असतो, दुबळा झाल्यासारखा असतो, तेव्हा त्याच्या पिछाडीवरून जोरकस हल्ला चढवला जाई. शत्रूला नेहमी दबावात ठेवणे हे गनिमी काव्याचे मुख्य तंत्र आहे. यामुळे शत्रुत एक प्रकारची असुरक्षितता भावना घर करून राहते व तो मनाने खचून जातो.

आपल्यापेक्षा बलशाली शत्रूवर कशाप्रकारे हल्ले करून त्यांनी जेरीस आणावे याचे कौटिल्याने अर्थशास्त्रात बारकाईने वर्णन केले आहे. शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध प्रतापगडचा डोंगराळ भाग गनिमी काव्याचे सर्वोत्तम उदाहरण सांगता येईल. शाहिस्तेखानाच्या सैन्यावर अगदी याच तंत्राचा वापर केला. उंबरखिंडीचे युद्ध हा याचाच नमुना. महाराजांनी आपल्या अनेक मोहिमांमध्ये गनिमी काव्याचे सर्वोत्तम उदाहरणे दिली आहेत. महाराज एका मोहिमेत जो गनिमी कावा वापरात ती पद्धत दुसऱ्या स्वारी मध्ये पुन्हा बदलली जाई. त्यामुळे शत्रूला कधीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढील मोहिमेचा अंदाज आला नाही. जाता जाता एवढेच शिवछत्रपती बाबत म्हाणावे वाटते.


‘झाले बहु, आहेतही बहु, होतीलही बहु, परंतु या सम नाही

लेखक

प्रा. डॉ. संतोष यादव

अभिरक्षक, अहिल्यानगर ऐतिहासिक वस्तू संग्रहालय