Gulabrao Patil : जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांची कामे वेळेत पूर्ण करा : गुलाबराव पाटील

Gulabrao Patil : जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांची कामे वेळेत पूर्ण करा : गुलाबराव पाटील

0
Gulabrao Patil : जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांची कामे वेळेत पूर्ण करा : गुलाबराव पाटील
Gulabrao Patil : जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांची कामे वेळेत पूर्ण करा : गुलाबराव पाटील

Gulabrao Patil : नगर : उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व गावांमध्ये पाणी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पाणी पुरवठा (Water Supply) योजनांची कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी दिले.

अवश्य वाचा : लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता ‘या’ दिवशी मिळणार

प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांतर्गत कामांचाही आढावा

अहिल्यानगर जिल्ह्यातील तसेच शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील गावाच्या पाणी पुरवठा योजनेचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. यावेळी पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, आमदार मोनिका राजळे, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी तसेच अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

नक्की वाचा : पूर्ववैमनस्यातून अपहृत तरुणाचा खून; आणखी पाच आरोपी ताब्यात

मुदतीत काम पूर्ण न केलेल्या कंत्राटदारांना दंड (Gulabrao Patil)

यावेळी शेवगाव पाथर्डी व परिसरातील गावात प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांतर्गत सुरु असलेल्या कामांचाही आढावा घेण्यात आला. ही सर्व कामे गतीने पूर्ण करावीत. योजना अंमलबजावणीतील अडचणी तत्परतेने दूर कराव्यात. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्थानिक आमदार, सरपंच तसेच शिक्षण समिती अध्यक्ष यांच्यासोबत बैठक घेऊन आढावा घ्यावा. गावातील शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात, पाण्याची टाकी बसवण्यासाठी जागा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी. उन्हाळा सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याची टाकी बसवण्याची कामे तातडीने सुरू करावी. तसेच गावात विहित मुदतीत काम पूर्ण न केलेल्या कंत्राटदारांवर नियमानुसार दंड आकारण्यात यावा. सर्व गावात योजना अमंलबजावणीसाठी उपयुक्त जागा पाहणी करून त्याची माहिती संबंधितांनी आढावा बैठकीत सादर करावी, अशा सूचना पाटील यांनी दिल्या. शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील भगवान गड व ४६ गावांतील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तसेच अमरापूर- माळीबाभुळगाव, बोधेगाव, शहरटाकळी या गावातील पाणीपुरवठा योजनांच्या कामाबाबत आढावा घेण्यात आला.