Gulabrao Patil : नगर : अहिल्यानगरची १०७ कोटींची पाणी योजना आम्ही मंजूर केली. हे आम्ही कधी सांगितले नाही. मुले आम्ही पैदा करायची, अन बारस तुम्ही घालायचे हा धंदा आमचा नाही. अहिल्यानगर हा शिवसेनेचा (Shiv Sena) बालेकिल्ला आहे. पाच वेळेस शिवसेनेचा आमदार व तीन वेळेस महापौर राहिला आहे. तुम्ही दादागिरी ची भाषा मला शिकवू नका, तो धंदा आमचा आहे. आम्ही मंत्रीपदाला लाथ मारली नसती तर तुमचे काय झाले असते, असा प्रश्न उपस्थित करत मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) व भाजपच्या (BJP) नेत्यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.
नक्की वाचा : सिसपे घोटाळ्याप्रकरणी निर्णायक वळण; पोलीस अधीक्षक घार्गे यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती
शिवसेना उमेदवारांसाठी प्रचार सभा
अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीच्या शिवसेना उमेदवारांच्या प्रचार सभेसाठी शिवसेना शिंदे गटाचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे आज (ता. १०) अहिल्यानगर येथे आले होते, यावेळी ते बोलत होते. यावेळी सहसंपर्कप्रमुख संजीव भोर, माजी महापौर शीलाताई शिंदे, रोहिणी शेंडगे, शिवसेनेचे शहर जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले, शहर प्रमुख सचिन जाधव, बाळासाहेब बोराटे, गणेश कवडे, विक्रम राठोड, स्वाती जाधव, संदेश कार्ले, शरद झोडगे, रामदास भोर, संभाजी कदम, सचिन शिंदे, श्याम नळकांडे, संतोष गेनाप्पा आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अवश्य वाचा : देवेंद्र मामा रेल्वे द्या, विखे मामा रेल्वे द्या… विद्यार्थ्यांनी दिल्या घोषणा
यावेळी पाटील म्हणाले की, (Gulabrao Patil)
अहिल्यानगर मध्ये सध्या दहशतीचे वातावरण आहे. कायद्याचे रक्षण करणारेच भक्षक बनले आहेत. शिवसैनिकांना धमकी दिली तर चारी मुंडचित करू. ज्याच्यावर ज्याच्यावर केसेस नाही तो शिवसैनिकच नाही. त्यामुळे शिवसेनेच्या नादी लागू नका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणीला पैसे देताना ना हिंदू पाहिला ना मुस्लिम ना बौद्ध पाहिला. सर्व महिलांना लाडक्या बहिण योजना लागू केली. तसेच मुलींना मोफत शिक्षण सुविधा उपलब्ध करून दिली. शिवसेनेची चिवट जात आहे. कटंगे मगर, पीछे नही हटेंगे असे शिवसैनिक आहेत. शिवसैनिकांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मोठे केले. मात्र दुसरीकडे घराणेशाही सुरू आहे. एकीकडे भगवा झेंडा दाखवायचा अन एकीकडे एमआयएम युती करायची, अशी दुटप्पी भूमिका घेत आहे. शिवसेना ही विचाराची लढाई घेऊन चालणार पक्ष आहे, त्यांनी म्हटले आहे.
हे देखील वाचा: मुंबईत कोण महापौर होणार?, प्रचारसभेत देवेंद्र फडणवीसांचे ठाकरे अन् राऊतांना टोले



