Guru Nanak Jayanti : नगर : जो बोले, सो निहाल, सत श्री अकाल… चा जयघोष, अखंडपाठ, किर्तन व प्रवचनांच्या भक्तीमय वातावरणात शहरातील विविध गुरुद्वारा येथे गुरुनानक देवजी (Guru Nanak Jayanti) यांची ५५५ वी जयंती म्हणजेच गुरुपुरब उत्साहात साजरा करण्यात आला. शुक्रवार (ता. १५) सकाळी तारकपूर येथील भाई कुंदनलालजी गुरुद्वारा (Gurudwara) येथून शीख, पंजाबी व सिंधी समाजाच्या वतीने पारंपारिक वाद्य सह प्रभातफेरी काढण्यात आली होती. यामध्ये समाजबांधव व महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन गुरुनानक देवजी यांचा जयघोष केला.
नक्की वाचा : “मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही”- देवेंद्र फडणवीस
जनक आहुजा परिवाराच्या वतीने स्वागत
तारकपूर परिसरातून निघालेल्या या प्रभातफेरीचे टॉपअप पेट्रोल पंम्प येथे जनक आहुजा परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात आले. फेरीमध्ये वाहनावर असलेल्या गुरुग्रंथ साहिबावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. तर गुरुनानक देवजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित भाविकांनी सामुदायिक अरदास (प्रार्थना) करुन सुख, समृध्दी व शांततेसाठी प्रार्थना केली.याप्रसंगी जनक आहुजा, हरजितसिंह वधवा, रवी बक्षी, राजीव बिंद्रा, जतीन आहुजा, अभिमन्यू नय्यर, अनिश आहुजा, राजेंद्र कंत्रोड, बबलू आहुजा, ब्रिजमोहन कंत्रोड, निप्पू धुप्प्ड, सौरभ आहुजा, सतीश गंभीर, किशोर कंत्रोड, सागर कुमार, गुलशन कंत्रोड, कैलाश नवलानी, जय रंगलानी, भारत पेट्रोलियमचे टेरीटोरी कॉर्डिनेटर किर्ती कुमार, विकी कंत्रोड, दिनेश कंत्रोड, पियुष कंत्रोड, गौरव कंत्रोड, दामोदर माखीजा, अवतार गुरली, मनमोहन चोपडा, रोहित बत्रा आदींसह समाजबांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
अवश्य वाचा : डाळ मंडई ही महाराष्ट्रातील अग्रेसर बाजारपेठ : संग्राम जगताप
लंगरचा भाविकांनी घेतला लाभ (Guru Nanak Jayanti)
गुरुनानक जयंतीनिमित्त मागील सात दिवसापासून शहरातील व तारकपूर येथील गुरुद्वारा येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे व सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कीर्तन-प्रवचन, अखंडपाठ, सांस्कृतिक कार्यक्रमासह लंगरचा भाविकांनी लाभ घेतला. कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून गुरूनानक देवजी यांचे संदेश व विचार समाज बांधवांना सांगण्यात आले.