Guru Tegh Bahadur | नगर : ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी (Guru Tegh Bahadur) यांच्या ३५० व्या शहीदी शताब्दी वर्षाचे औचित्य साधून जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. २२) मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे वाचा – पारनेरच्या विद्यार्थ्यांसाठी जागतिक करिअरची दारे उघडी
गोविंदपुरा येथे शिबिर (Guru Tegh Bahadur)
अहिल्यानगरमधील गोविंदपुरा येथील गुरुद्वारा भाई दया सिंहजी या ठिकाणी हे शिबिर पार पडणार आहे. ते सर्व नागरिकांसाठी पूर्णपणे विनामूल्य असणार आहे. समाजातील वाहन चालक, कारखाना कामगार, मजूर , आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांचे आरोग्य सुदृढ राहावे, या मुख्य उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
अवश्य वाचा – पत्नीला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेलेल्या नितीनची निर्घुण हत्या; दोन गट रुग्णालयातच भिडले
विविध शिबिरांचे आयोजन (Guru Tegh Bahadur)
या आरोग्य शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाद्वारे सर्वसाधारण आरोग्य तपासणी, मोफत रक्त चाचण्या, नेत्र व श्रवण तपासणी, हृदयरोग, स्त्रीरोग व अस्थिरोग तज्ज्ञांचा विशेष सल्ला या सेवा दिल्या जाणार आहेत. ‘आयुष्यमान भारत’ योजनेसाठी जागेवरच नावनोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
हे पहा – विद्यार्थिनीच्या धाडसाला सलाम! स्वतःच्या अपहरणाचा डाव उधळला…
सेवेकऱ्यांचे आवाहन (Guru Tegh Bahadur)
मानवता व धार्मिक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाची व त्यांच्या कार्याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी, शिबिराच्या ठिकाणी त्यांच्या जीवनावर आधारित विशेष लघुपट दाखवण्यात येणार आहे. या समाजोपयोगी उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी गरजू नागरिक, तसेच सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा. जास्तीत जास्त लोकांनी या शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन गुरुद्वारा भाई दया सिंहजींचे सेवेकरी व जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.



