Gutkha : गुटख्याची वाहतूक; एकजण ताब्यात

Gutkha : गुटख्याची वाहतूक; एकजण ताब्यात

0
Gutkha : गुटख्याची वाहतूक; एकजण ताब्यात
Gutkha : गुटख्याची वाहतूक; एकजण ताब्यात

Gutkha : नगर : गुटखा (Gutkha) पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची दुचाकीवरून चोरटी वाहतूक करणाऱ्या एका तरूणाला तोफखाना पोलिसांनी (Tofkhana Police Station) ताब्यात घेतले आहे. शेरअली आरीफ तांबोळी (वय २५, रा. व्यापारी मोहल्ला, नालबंद खुंट, अहिल्यानगर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद (Case Registered) करण्यात आला आहे.

अवश्य वाचा : संगमनेरमध्ये रामजन्मोत्सव भक्तिमय वातावरणात

४२ हजारांचा किमतीचा मुद्देमाल हस्तगत

सिध्दीबाग परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी ४२ हजार २९२ रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सिध्दीबागेकडून जगुभाई तालीम कडे जाणाऱ्या रस्त्यावर संशयित इसम शेरअली आरीफ तांबोळी हा दुचाकीवरून जात होता. तोफखाना पोलिसांच्या पथकाने त्याला थांबवून झडती घेतली असता, त्याच्याकडे विमल, हिरा, डायरेक्टर असा विविध कंपन्यांचा गुटखा आणि तंबाखूचे पाकीट मिळून आले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

गुटख्यासह दुचाकी केली जप्त (Gutkha)

स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मानवी शरीरास अपायकारक असलेला हा साठा तो विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी गुटख्यासह दुचाकी जप्त केली आहे. पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.