Har Ghar Tiranga : ‘हर घर तिरंगा’ अभियान बलशाली भारताच्या एकजुटीचे प्रतीक : मंत्री विखे पाटील

Har Ghar Tiranga : 'हर घर तिरंगा' अभियान बलशाली भारताच्या एकजुटीचे प्रतीक : मंत्री विखे पाटील

0
Har Ghar Tiranga : 'हर घर तिरंगा' अभियान बलशाली भारताच्या एकजुटीचे प्रतीक : मंत्री विखे पाटील
Har Ghar Tiranga : 'हर घर तिरंगा' अभियान बलशाली भारताच्या एकजुटीचे प्रतीक : मंत्री विखे पाटील

Har Ghar Tiranga : नगर : भारतीय स्वातंत्र्य दिना (Indian Independence Day) निमित्ताने आयोजित केलेले ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Tiranga) अभियान बलशाली भारताच्या एकजुटीचे प्रतीक ठरणार आहे. या अभियानात प्रत्येक नागरिकांने सहभाग घेऊन स्वातंत्र्य दिन (Independence day) साजरा करण्याचे आवाहन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केले आहे.

नक्की वाचा : आमची सत्ता आली तर लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवू’- संजय राऊत

हर घर तिरंगा अभियान यशस्वी करण्यासाठी नियोजन

देशाच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष उत्साही वातावरणात पार पडले. देशाला बलशाली बनवण्यासाठी देशभर यानिमित्ताने हर घर तिरंगा अभियान राबविण्यात आले. तोच उत्साह देशातील नागरिकांमध्ये कायम राहावा, म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाही ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्याचे आवाहन केले आहे. मंत्री विखे पाटील यांच्या पुढाकाराने जिल्ह्यामध्येही हर घर तिरंगा अभियान यशस्वी करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. याचा प्रारंभ आश्वी येथील महाविद्यालयातून पालकमंत्र्याच्या उपस्थितीत करण्यात आला. हर घर तिरंगा अभियान संपूर्ण जिल्ह्यात लोकसहभागातून यशस्वी व्हावे, असे सूचीत करून प्रशासनाने सर्व शैक्षणिक संस्था सामाजिक संस्था व्यापारी प्रतिष्ठान विविध संघटनाच्या प्रतिनिधीशी समन्वय साधून स्वातंत्र्य दिन हर घर तिरंगा अभियानाने साजरा करा, असे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले.

अवश्य वाचा: मनाेज जरांगे गरजले; आता विधानसभेला दणादण नाव घेऊन पाडणार, कुणाचे टेन्शन वाढणार?

मंत्री विखे पाटील म्हणाले, (Har Ghar Tiranga)

स्वातंत्र दिनाच्या निमिताने हर घर तिरंगा अभियान राबविण्याची संकल्पना अखंड भारताच्या एकजुटीचे प्रतीक ठरणार असल्याने यामध्ये गावपातळीवर सर्वच राजकीय पक्ष संघटनांचा सहभाग असावा, असा प्रयत्न पदाधिकारी कार्यकर्त्‍यांनी करावा, असे मंत्री विखे पाटील यांनी सूचित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here