Har Ghar Tiranga Abhiyan : धर्मवीरगडावर फडकला तिरंगा

Har Ghar Tiranga Abhiyan : धर्मवीरगडावर फडकला तिरंगा

0
Har Ghar Tiranga Abhiyan : धर्मवीरगडावर फडकला तिरंगा
Har Ghar Tiranga Abhiyan : धर्मवीरगडावर फडकला तिरंगा

Har Ghar Tiranga Abhiyan : नगर : ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत (Har Ghar Tiranga Abhiyan) श्रीगोंदे तालुक्यातील पेडगावच्या किल्ले धर्मवीरगडावर (Dharmaveergad) शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनतर्फे ध्वजारोहण करण्यात आले. छत्रपती संभाजी महाराजांवरील (Chhatrapati Sambhaji Maharaj)अनन्वित अत्याचाराचा साक्षीदार असलेल्या या किल्ल्यावरील हा सोहळा ऐतिहासिक घटना ठरली आहे. मागील तीन वर्षांपासून शिवदुर्गने ही परंपरा जपली आहे.

Har Ghar Tiranga Abhiyan : धर्मवीरगडावर फडकला तिरंगा
Har Ghar Tiranga Abhiyan : धर्मवीरगडावर फडकला तिरंगा

अवश्य वाचा: महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने घेतलेल्या निर्णयावर न्यायालयाचा शिक्कामाेर्तब : मंत्री विखे पाटील

विविध संस्थाच्या प्रतिनिधींची उपस्थिती

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत काल (ता. १३) रोजी किल्ले धर्मवीरगड येथे श्रीगोंद्याच्या तहसीलदार डॉ.क्षितिजा वाघमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेडगाव जुने व ज्ञानांकुर इंग्लिश स्कूलच्या शालेय विद्यार्थ्यांसह पेडगावचे सरपंच इरफानभाई पिरजादे, उपसरपंच भगवान कणसे, रोहिदास पवार, प्रतिभा झिटे, गणेश झिटे, शंभूव्याख्याते लक्ष्मण नाईकवाडी, शिवाजी नवले व किल्ले धर्मवीरगडावर संवर्धन कार्य करणाऱ्या विविध संस्थाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Har Ghar Tiranga Abhiyan : धर्मवीरगडावर फडकला तिरंगा
Har Ghar Tiranga Abhiyan : धर्मवीरगडावर फडकला तिरंगा

नक्की वाचा: ‘छगन भुजबळांच्या नादात फडणवीस सत्ता घालवून बसणार’-मनोज जरांगे

यांचे मार्गदर्शन व सहकार्य (Har Ghar Tiranga Abhiyan)

शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनतर्फे शिवदुर्गचे अध्यक्ष व इतिहास संशोधक राजेश इंगळे, दिगंबर भुजबळ, अजित दळवी, अमोल बडे, अजित लांडगे, वैशाली परहर, रंजना सोनवणे आदींनी परिश्रम घेतले. या सोहळ्यासाठी नाशिक येथील राज्य पुरातत्त्व विभाग, नगरमधील भारतीय पुरातत्व विभाग, नगर जिल्हाधिकारी कार्यालय, श्रीगोंदा तहसील कार्यालय यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here