Hard Labor Punishment : १४ वर्षांच्या विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला २० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा

Hard Labor Punishment : १४ वर्षांच्या विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला २० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा

0
Hard Labor Punishment : १४ वर्षांच्या विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला २० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा
Hard Labor Punishment : १४ वर्षांच्या विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला २० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा

Hard Labor Punishment : नगर : अहिल्यानगर शहरातील खासगी इंग्लिश स्पोकन क्लास मधील शिक्षकाने १८ ऑगस्ट २०१८ रोजी १४ वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार (Torture) केला होता. या प्रकरणात अहिल्यानगर जिल्हा व सत्र न्यायालयाने (Ahilyanagar District and Sessions Court) बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यानुसार आरोपी शिक्षकाला दोषी ठरवत २० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा (Hard Labor Punishment) आणि १० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा तसेच दंड न भरल्यास सहा महिने सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. तर अनैसर्गिक लैंगिक संबंधाच्या गुन्ह्यात पाच वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व तीन हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक महिना सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे. 

नक्की वाचा : नारायणडोह येथील दरोड्यातील दोन आरोपी जेरबंद

बळजबरीने शरीर संबंध

विशाल लक्ष्मण बारगळ (वय २८, रा. बोल्हेगाव, अहिल्यानगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. सरकारी पक्षातर्फे खटल्याचे कामकाज अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अनंत चौधरी व कोमल राठोड यांनी पाहिले. विशाल बारगळ हा खासगी स्पोकन इंग्लिश क्लास चालवत होता. १८ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी ९.१५ वाजताच्या सुमारास पीडित मुलगी आरोपीच्या खासगी स्पोकन इंग्लिश क्लासमध्ये शिकवणीसाठी गेली होती. पीडित अल्पवयीन आहे हे आरोपीस माहीत असून सुध्दा, पीडितेशी बळजबरीने शरीर संबंध व अनैसर्गिक शारीरिक संबंध केला. याबाबतचा गुन्हा पीडितेने तोफखाना पोलीस ठाण्यात नोंदवला.

अवश्य वाचा : “आदिवासी बांधवांना अंत्यविधीसाठी जागा का नाही?”; सभागृहात काशिनाथ दाते यांचा आक्रमक प्रश्न

संदीप मिटके यांची साक्ष महत्वपूर्ण (Hard Labor Punishment)

या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पीडित मुलगी तसेच पीडितेचे पालक, वैद्यकीय अधिकारी, तपासी अंमलदार पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. तसेच वयासंदर्भात महापालिकेचे आरोग्य अधिकाऱ्यांची साक्ष महत्वाची ठरली. या केसची सुनावणी चालू असताना अतिरिक्त सरकारी वकिलांनी युक्तीवाद केला की, पीडित मुलगी ही घटनेच्या वेळी केवळ १४ वर्षे होती. अशा कमी वयामध्ये घडलेल्या घटनेमुळे बालमनावर अतिशय वाईट परिणाम होत असतो व त्याचे ओरखडे आयुष्यभर त्यांच्या मनावर पडतात.

हे देखील वाचा : झिम्बाब्वेविरुद्ध ‘करो या मरो’ लढत”; सुपर-८मध्ये भारताची कसोटी

संपूर्ण पुरावा ग्राह्य धरून आरोपीला ठोठावली शिक्षा

आरोपीने अत्यंत वाईट पध्दतीने हा गुन्हा केला. त्यामुळे आरोपीला जर या केसमध्ये निर्दोष सोडले तर समाजातील वाईट प्रवृत्ती वाढीस लागून लहानग्या अल्पवयीन मुलांवर अशा घटना पुन्हा पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच वय १४ वर्षे असलेली अज्ञान मुलगी ही आरोपी विरूध्द काहीही कारण नसताना खोटे का सांगेल? त्यामुळे आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा करण्यात यावी. सरकारी वकिलांचा युक्तीवाद तसेच आलेला संपूर्ण पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला शिक्षा ठोठावली. या खटल्याचे कामकाज अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अनंत चौधरी व कोमल राठोड यांनी पाहिले. त्यांना पोलीस उपनिरीक्षक स्वाती देवडकर व पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, तसेच त्यांना पैरवी अधिकारी पोलीस कर्मचारी आर.डी आडसुळ यांनी सहकार्य केले.