नगर : भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी आज मोठा निर्णय घेतला आहे. हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश (NCP Party) करणार असल्याची घोषणा केली. आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह होता की, शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करावा. त्यामुळं आम्ही हा निर्णय घेत असल्याचे हर्षवर्धन पाटील म्हणाले. हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरमध्ये (Indapur) पत्रकार परिषद घेत हा निर्णय जाहीर केला.
नक्की वाचा : दुर्गामाता दौडीत नारीलाच नाकारले,संभाजी भिडेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय (Harshvardhan Patil)
हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी कार्यकर्त्यांनी देखील रामकृष्ण हरी वाजवा तुतारी अशी मागणी केली. यानंतर पत्रकार परिषद घेत पाटील यांनी शरद पवार यांच्या पक्षात जाण्याचा निर्णय गेतला आहे. मी हा निर्णय घेण्यापूर्वी भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतल्याचे पाटील म्हणाले. इंदापूरची जागा ही विद्यमान सदस्याला जाणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले. दुसरा पर्याय काढू असे फडणवीस म्हणाले. पण दुसरा पर्याय स्वीकारणे कार्यकर्त्यांना मान्य झाले नसते. व्यक्तिगत तो निर्णय योग्य ठरला असता, पण जनतेचा प्रश्न असतो असे पाटील म्हणाले.
अवश्य वाचा : पुण्यात दोन चिमुरड्या मुलींवर स्कुल बस ड्रायव्हरकडून लैंगिक अत्याचार
हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांच्यात नेमकी काय चर्चा ? (Harshvardhan Patil)
हर्षवर्धन पाटील म्हणाले, काल सिल्व्हर ओकवर शरद पवारांशी बैठक झाली. पवारांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला. जनतेचा आग्रह असेल तर तुम्ही निर्णय घ्या. त्यानंतर बाकीची जबाबदारी माझी राहील. मग आपण प्रवेश करायचा की नाही? हे माझ्या इंदापूरच्या जनतेने ठरवावे. इंदापूर तालुक्यातील सर्व राजकीय निर्णय जनतेच्या मताने झाले आहेत. इंदापुरातकोणाच्या स्वार्थासाठी निर्णय होत नाहीत, असं देखील त्यांनी स्पष्ट केले.