
Harshvardhan Sadgir : नगर : पुण्यातील वाघोली, तालुका हवेली इथं पार पडलेल्या यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या (Maharashtra Kesari Wrestling Tournament) अंतिम लढतीसाठी सोलापूरचा महेंद्र गायकवाड आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर (Harshvardhan Sadgir) यांच्यात सामना झाला. अंतिम लढतीत हर्षवर्धन सदगीर याने महेंद्र गायकवाडला (Mahendra Gaikwad) 4-2 असे पराभूत केलं. या विजयासह हर्षवर्धन सदगीर सातवा डबल महाराष्ट्र केसरी ठरला. पहिल्या डावात दोघांची 1-1 अशी बरोबरी झाली होती.
अवश्य वाचा : कंट्रोल रूम आणि सीसीटीव्ही यंत्रणेसाठी निधी मंजूर; तांबे यांच्या प्रयत्नांना यश
मानाच्या गदेसह जिंकली फॉर्च्यूनर कार
महाराष्ट्र केसरीच्या किताबासह हर्षवर्धन सदगीरने मानाच्या गदेसह फॉर्च्यूनर कारही जिंकली आहे. त्यामुळे, फॉर्च्यूनर कार जिंकणारा पहिला महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर ठरला. उपमहाराष्ट्र केसरी पैलवान महेंद्र गायकवाड ठरला असून महेंद्र गायकवाड यांस चांदीची गदा आणि स्कॉर्पिओ कार बक्षीस स्वरुपात मिळाली आहे. त्यामुळे, महाराष्ट्र केसरी आणि उपमहाराष्ट्र केसरी पैलवानांवर बक्षीसांचा वर्षाव झाल्याचं पाहायला मिळत आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
हर्षवर्धन सदगीर यानं 4-2 ने मिळवला विजय (Harshvardhan Sadgir)
हर्षवर्धन सदगीरला महाराष्ट्र केसरीची गदा, फॉर्च्यूनर कार आणि 5 लाख रुपयांचा धनादेश अशी बक्षिसांची मोठी रक्कम मिळाली आहे. महेंद्र गायकवाड यानं माती विभागातील अंतिम फेरीत सिकंदर शेखचा पराभव केला. तर हर्षवर्धन सदगीर यानं जय पाटील याचा गादी विभागातील अंतिम फेरीत केला. यामुळं महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत हर्षवर्धन सदगीर आणि महेंद्र गायकवाड आमने सामने आले. शेवटच्या डावात हर्षवर्धन सदगीर बाहेर गेल्यानं एक गुण महेंद्र गायकवाडला मिळाला. कुस्तीचा वेळ संपला तेव्हा हर्षवर्धन सदगीर यानं 4-2 असा विजय मिळवला.
“या क्षणासाठी मी खूप कष्ट केले आहेत. डबल महाराष्ट्र केसरी होणं हे माझ्यासाठी अभिमानाचं स्वप्न होतं,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत दमदार कामगिरी करत पुन्हा एकदा किताब पटकावणाऱ्या हर्षवर्धन सदगीर यांनी मोठी घोषणा करत मॅटवरील कुस्तीमधून निवृत्ती जाहीर केली. सदगीर यांनी सांगितलं की, 2019 आणि 2020 साली महाराष्ट्र केसरी किताब जिंकल्यानंतर त्यांचं मोठं स्वप्न पूर्ण झालं होतं. मात्र त्या काळात आर्थिक अडचणींमुळे शासकीय नोकरीची गरज भासली. मी दीड वर्ष विविध नेत्यांना भेटलो, प्रयत्न केले, पण नोकरी मिळाली नाही. तरीही मला त्याची खंत नव्हती,” असं त्यांनी स्पष्ट केलं. या प्रवासात अनेकांनी आपल्याला संपलेलं समजलं, पैलवान म्हणून कमी लेखलं, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. पण त्याच वेळी त्यांनी हार न मानता पुन्हा मेहनत घेतली आणि डबल महाराष्ट्र केसरी बनून दाखवलं.


