नगर : रावणालाही एवढा अहंकार (Arrogance) नव्हता एवढा भारतीय जनता पार्टी (BJP) दाखवत असल्याची टीका (Criticism) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ(Harshvardhan Sapkal) यांनी केली. ते परभणीच्या पाथरीतील बोलत होते. भाजपने राज्यात कार्यकर्त्यांना बाजूला ठेवले आणि त्यांच्या नेत्यांच्या नातेवाईकांना निवडणुकीत उतरवल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अजित पवारांचे निधी देण्यासंदर्भातील विधान म्हणजे दादागिरी असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
नक्की वाचा: तेजस विमान कोसळून मृत्यू पावलेले नमांश सियाल नेमके कोण होते?
‘गुंड प्रवर्तीचे गुन्हेगार भारतीय जनता पार्टीने निवडणुकीत दिलेत’ (Harshvardhan Sapkal On BJP)
भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्याची निवडणूक म्हणून लढत नाही. नेत्यांनी, मंत्र्यांनी, आमदारांनी त्यांच्या पत्नी, बहिणी, त्यांचे भाचे, मामेभाऊ यांना उभे केलेत. भारतीय जनता पार्टीने कार्यकर्त्यांना बाजूला सारल्याची टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. तर दुसरीकडे मॉब लिंचिंग वाले, कोयता गॅंगवाले अशा आरोपींना त्यांनी तिकीट दिले आहे. कार्यकर्त्यांना बाद करून एकीकडे घरातले उमेदवार तर गुंड प्रवर्तीचे गुन्हेगार भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीमध्ये दिल्याचे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
अवश्य वाचा: लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांवर आता मोठी कारवाई
भाजपकडून लोकशाही गुंडाळून टाकण्याचं काम सुरु (Harshvardhan Sapkal On BJP)
अहिल्यानगरमध्ये पोलीस येतात, ज्यांनी अर्ज भरला आहे त्यांना पकडून नेतात. त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करतात. रात्री पोलिसांच्या गाडीतून विखे पाटील साहेबांच्या घरी नेतात. विखे साहेब त्यांना चित्रपटामध्ये खलनायक जसा वागतो तशाप्रकारे त्यांना दोष देतात असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. लोकशाही गुंडाळून टाकण्याच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी जे महाराष्ट्र मध्ये करत आहे ते पुरोगामी महाराष्ट्राला शोभण्यासारखं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.



