Harshawardhan Sapkal:सत्तेवर बसवलेले लोक आता राक्षसाप्रमाणे बोलू लागलेत;हर्षवर्धन सपकाळ यांचा अजित पवारांवर हल्लाबोल

0
Harshawardhan Sapkal:सत्तेवर बसवलेले लोक आता राक्षसाप्रमाणे बोलू लागलेत;हर्षवर्धन सपकाळ यांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Harshawardhan Sapkal:सत्तेवर बसवलेले लोक आता राक्षसाप्रमाणे बोलू लागलेत;हर्षवर्धन सपकाळ यांचा अजित पवारांवर हल्लाबोल

Harshawardhan Sapkal : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला आर्थिक स्थितीचे कारण देताना ना यांची जीभ थरथरते ना यांना लाज वाटते. जनतेने राक्षसी बहुमत देऊन सत्तेवर बसवलेले लोक आता राक्षसाप्रमाणे बोलू लागलेत,अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshawardhan Sapkal) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर (Ajit Pawar) केली आहे. एक्स या माध्यमावर त्यांनी याबाबत पोस्ट केली आहे. शेतकऱ्यांसह कर्जदारांनी ३१ मार्चपूर्वी बँकांमध्ये कर्जाचे परतफेड करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्या होत्या.

नक्की वाचा : मोठी बातमी!राज्यातील ‘या’ लाडक्या बहिणींना आता दरमहा मिळणार फक्त ५०० रुपये

हर्षवर्धन सपकाळ यांच्या पोस्टमध्ये नेमकं काय ?(Harshawardhan Sapkal)

हर्षवर्धन सपकाळ यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की, हे बोलताना ना यांची जीभ थरथरते ना यांना लाज शरम वाटते. जनतेने राक्षसी बहुमत देऊन सत्तेवर बसवलेले लोक आता राक्षसाप्रमाणे बोलू वागू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत कर्जमाफी देऊ, असे आश्वासन देऊन महायुतीने राज्यातील शेतक-यांची मते घेतली आणि सत्तेवर येताच ३१ मार्च पूर्वी पीक कर्ज भरा, कर्जमाफी मिळणार नाही, असे मुजोरपणे सांगत आहेत. लाडक्या बहिणींची फसवणूक अगोदरच केली आहे. २१०० चे आश्वासन देऊन त्यांच्या हातावर १५०० रुपये टेकवले जात आहेत. विविध कारणे देऊन १० लाखांहून अधिक महिलांना अपात्र करून योजनेचा लाभ बंद केला. आता २१०० रुपये मिळण्यासाठी ५ वर्ष वाट पहावी लागेल असे उद्दामपणे सांगत आहेत.अशी टीका हर्षवर्धन सपकाळांनी अजित पवारांवर केलीय.

अवश्य वाचा : धक्कादायक! महाराष्ट्रीयन तरुणीची बंगळुरूत हत्या;सुटकेसमध्ये आढळला मृतदेह 

 ‘गुलकंद’ चित्रपटातील ‘चल जाऊ डेटवर’ हे रंगतदार गाणं प्रदर्शित  (Harshawardhan Sapkal)

राज्यातील शेतकऱ्यांना यापूर्वी वीजमाफी, पीक कर्जाच्या व्याजात सवलत,दुधाचे अनुदान देण्यात आले आहे. लाडकी बहीण योजनेवर तर सुमारे ४५ हजार कोटींचा बोजा सरकारवर असल्याने कर्जमाफीसारखी सध्या तरी राज्याची आर्थिक परिस्थिती नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांसह कर्जदारांनी ३१ मार्चपूर्वी बँकांमध्ये कर्जाची परतफेड करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी हे ट्विट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here