Harshwardhan Sapkal : भाजपही विरोधकांची नेते खाणारी चेटकीन : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचा आरोप

Harshwardhan Sapkal : भाजपही विरोधकांची नेते खाणारी चिटकीन : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचा आरोप

0
Harshwardhan Sapkal : भाजपही विरोधकांची नेते खाणारी चिटकीन : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचा आरोप
Harshwardhan Sapkal : भाजपही विरोधकांची नेते खाणारी चिटकीन : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचा आरोप


Harshwardhan Sapkal : नगर : राज्यात सध्या गुंडगिरी व दडपशाही मोठ्या प्रमाणावर सुरू असून सत्ताधारी भाजपकडून (BJP) विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजप ही विरोधकांची नेते “खाणारी चेटकीण” असल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी आज पत्रकार परिषदेत (Press conference) केली.


काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे आज अहिल्यानगर येथे आले होते यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी खासदार निलेश लंके, काँग्रेसचे शहराध्यक्ष दीप चव्हाण तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिषेक कळमकर आदींचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नक्की वाचा : अहिल्यानगर महापालिकेत युतीचाच महापौर होईल: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सपकाळ म्हणाले की,

भाजप सत्ताधाऱ्यांची गुंडगिरी राज्यात खुलेआम सुरू आहे. आजही विरोधकांना प्रचार करण्यासाठी मैदान उपलब्ध करून दिले जात नाही. फक्त फोडाफोडी करणे आणि खोटे आरोप करणे हाच भाजपचा धंदा सुरू आहे. भाजपकडे आता निष्ठावंत पदाधिकारी उरलेले नाहीत. म्हणूनच ते काँग्रेस व इतर विरोधी पक्षांची माणसे व नेते पळवून नेत आहेत. त्यामुळे भाजप ही विरोधकांची नेते खाणारी चेटकीण असल्याची टीका त्यांनी केली.

महापालिका व नगरपालिका निवडणुकांमध्ये रस्ते, वीज, पाणी हे मूलभूत प्रश्न महत्त्वाचे असतानाही सरकारला विकासकामांशी काहीही देणेघेणे नाही. मराठी-उर्दू, महाराष्ट्रीयन-उत्तर प्रदेशी असे वादग्रस्त मुद्दे उभे करून विकासाचे प्रश्न गायब करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.

राज्यातील सत्ताधारी पक्ष सध्या “नुरा कुस्ती” खेळत असून एकमेकांवर टीका करत असल्याचे चित्र संशयास्पद आहे. एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा भाजपने या दोघांना सत्तेतून बाहेर काढावे किंवा त्यांनी स्वतः सत्तेतून बाहेर पडावे, मगच टीका करण्याचा अधिकार राहील, असे सपकाळ यांनी स्पष्ट केले.

अवश्य वाचा : प्रभाग सातमध्ये भाजपचे तीनही उमेदवार निवडून येणार: बाबासाहेब वाकळे

“पुसून टाका” हा त्यांचा अजेंडा (Harshwardhan Sapkal)

भाजप बेताल वक्तव्य करण्यातही मागे नाही. “पुसून टाका” हा त्यांचा अजेंडा झाला आहे. विलासराव देशमुख, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांचे अस्तित्व पुसण्याचे प्रयत्न झाले. दोन शिवसेना व दोन राष्ट्रवादी तयार करून त्यांनी हेच सिद्ध केले आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाच्या योजना बंद करण्याच्या मार्गावर असून लालकृष्ण आडवाणी व मुरली मनोहर जोशी यांच्याकडेही भाजपने दुर्लक्ष केले आहे. आरएसएसच्या कार्यालयांमध्ये फक्त मोदी आणि अमित शहा यांचेच फोटो लावण्याचा अजेंडा असून याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साथ देत असल्याची टीकाही त्यांनी केली.

यंदाच्या निवडणुकीत गुंडगिरी मोठ्या प्रमाणावर वाढली असून बंदुका व कोयत्यांच्या जोरावर दहशत निर्माण केली जात आहे. सोलापूर, खोपोली आणि अकोट येथे तीन जणांची हत्या झाली असतानाही सरकारला त्याचे गांभीर्य नाही. निवडणूक आयोगही पक्षपाती भूमिका घेत असून निष्पक्ष निवडणुका होणार नाहीत, अशी टीका सपकाळ यांनी केली.


प्रचारासाठी बाहेर पडल्यानंतर आम्हाला मैदान उपलब्ध करून दिले जात नाही, आमच्या हालचालींवर पाळत ठेवली जाते. सरकारच्या माध्यमातून हेरगिरी सुरू असून ही लोकशाहीसाठी धोकादायक बाब आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

हेही वाचा : फेसबुक लाइव्हमध्ये जातीवाचक वक्तव्य केल्याप्रकरणी रूपाली रासकरविरोधात ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल

महाराष्ट्र मध्ये आम्ही काही ठिकाणी स्वतंत्र लढत आहोत तर अनेक ठिकाणी आम्ही आघाडी सोबत लढत आहोत यांना काँग्रेसला आता एक नवीन व्हिडिओ बहुजन वंचित आघाडी हा मिळालेला आहे आम्ही सुद्धा आता लोकशाही वाचवण्यासाठ तसेच संविधान वाचवण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवत असल्याचे सपकाळ यांनी यावेळी सांगितले.

यावेळी खासदार निलेश लंके यांनी मोठ्या प्रमाणामध्ये दहशत गुंडगिरी सत्तेच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळत आहे बंदुकी दाखवून दमकुले जात आहे हा प्रकार अत्यंत गंभीर आहे या सर्व गोष्टींना सामोरे जाऊन आम्हाला या निवडणुकीमध्ये उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असेही ते म्हणाले. खासदार निलेश लंके पुढे म्हणाले की
सत्ताधाऱ्यांनी गोरगरिबांचे पैसे देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, मात्र ते असे न करता राजकीय स्वार्थासाठी सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार सत्ताधाऱ्यांकडून होत आहे, असा आरोप ही लंके यांनी केला आहे. तसेच प्रत्येक सभा तसेच राजकीय कार्यक्रम लंके यांच्या नावाने सभा पूर्ण होत नाही असा टोलाही त्यांनी लगावला.