Harshwardhan Sapkal | हर्षवर्धन सपकाळ यांचे भाजपला प्रत्युत्तर; संघ विचाराचे लोक इंग्रजांची गुलामी आणि हेरगिरी करत होते

0

Harshwardhan Sapkal | नगर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी आज (ता. १५) माध्यमांशी बोलताना  ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) शौर्य आणि स्वराज्य असा विचार दिला, अगदी त्याचप्रमाणे टिपू सुलताना यांनी त्याच समकक्ष काम केले आहे. त्यामुळे टिपू सुलतान यांना देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानले गेले पाहिजे, असं वक्तव्य केल्यानंतर भाजपच्या (BJP) नेत्यांकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे.

हेही वाचा – बालविवाह रोखण्यासाठी गावागावात शिक्षण पोहोचणे गरजेचे: शिंदे

सपकाळ यांच्यावर हल्लाबोल

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. टिपू सुलतानसारख्या नराधमाची तुलना छत्रपती शिवरायांशी करण्याचे काम त्यांनी केलंय. हे अतिशय निंदनीय आहे. हर्षवर्धन सपकाळ यांना लाज वाटली पाहिजे. सपकाळ यांनी माफी मागितली पाहिजे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर केल्यानंतर आता सपकाळ यांनी देखील फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे.

देवेंद्र फडणवीस ज्या संघ भाजपच्या विचारातून येतात त्या विचारांचे लोक इंग्रजाची गुलामी आणि हेरगिरी करत होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला इतिहास शिकविण्याच्या भानगडीत पडू नये असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

अवश्य वाचा – जिल्ह्याच्या विकासात जिल्हा सहकारी बँकेचे मोठे योगदान : माजी मंत्री थोरात 

सपकाळ म्हणाले…

हर्षवर्धन सपकाळ या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे शिवराय आमचा स्वाभिमान आहे आणि टिपू सुलतान पराक्रमी आणि स्वराज्यप्रेमी होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊनच ते इंग्रजाविरोधात लढत होते. ज्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान हे परकीयांशी लढत होते त्यावेळी देवेंद्र फडणवीस ज्या संघ भाजपाच्या विचारातून येतात त्या विचारांचे लोक इंग्रजाची गुलामी आणि हेरगिरी करत होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला इतिहास शिकविण्याच्या भानगडीत पडू नये. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भाजप आणि आरएसएसच्या भगतसिंह कोश्यारी सह कुणी कुणी काय-काय मुक्ताफळे उधळली आणि अवमान केलाय हे महाराष्ट्राची जनता विसरलेली नाही, असं या पोस्टमध्ये हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

हे पहा – डोळ्यांनी अंध असली तरी ‘ती’ देणार डोळस न्याय! थान्या नाथन नेमक्या कोण ?

छत्रपती शिवाजी महाराज यांचं शौर्य ज्याप्रकारचं आहे, त्यांनी जो स्वराज्याचा विचार दिला, त्याच मांदियाळीत, त्यांच्यानंतर बऱ्याच वर्षांनी टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्याविरोधात लढा पुकारला होता. त्या अर्थाने टिपू सुलतान हे र्शोर्य गाजवणारे युद्ध होऊ गेले, भारताचे भूमिपूत्र होऊन गेले, त्यांनी कधीही कोणत्याही विषारी, विखारी विचारांना जवळ केले नाही. त्यामुळे शौर्याचे लक्षण म्हणून आपण टिपू सुलतान यांच्याकडे शिवाजी महाराजांच्य समकक्ष पाहिले पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here