HDFC Bank : नगर : खाजगी क्षेत्रातील अग्रगण्य बँक म्हणून एचडीएफसी बँक (HDFC Bank) नावाजलेली आहे. एचडीएफसी बँकेने बुधवार, १६ जुलै रोजी शेअर बाजारांना (Share Market) माहिती दिली की, शनिवार १९ जुलै रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत विशेष अंतरिम लाभांश जाहीर करण्याचा आणि बोनस शेअर्स (Bonus Shares) देण्याचा विचार असल्याचे सांगितले. एचडीएफसी बँकेकडून त्यांच्या शेअरहोल्डर्ससाठी हा पहिलाच बोनस शेअर्स असेल. या बातमीमुळे आता एचडीएफसी बँक लिमिटेडचे शेअर्स आज बुधवारी १.५% ने वाढून २०२१.९० रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचले आहेत.
नक्की वाचा : कॅनडात जगन्नाथ रथयात्रेवर फेकली अंडी;भारतीयांचा संताप
बँकेतील ठेवींमध्ये वाढ
या तिमाहीत ठेवी मागील वर्षाच्या तुलनेत १६.२% आणि अनुक्रमे १.८% वाढून २७.६४ लाख कोटी रुपये झाल्या. तर कर्जे ६.७% वाढून २६.५३ लाख कोटी रुपयांवर गेली. त्यामुळे जून तिमाहीत एचडीएफसी बँकेच्या ठेवींमध्ये स्थिर ठेवींच्या तुलनेत मोठी वाढ झाली. मंगळवारी एचडीएफसी बँकेचे शेअर्स ०.८% वाढून १,९९८ रुपयांवर बंद झाले. हा शेअर २,०२७ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकाच्या जवळ व्यवहार करत आहे.
अवश्य वाचा : अभिमानास्पद! छत्रपती शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश
शेअर्समध्ये विभाजन (HDFC Bank)
एचडीएफसी बँकेने याआधी २०११ मध्ये स्टॉक स्प्लिटचा निर्णय घेतला होता. तेव्हा बँकेने १० रुपये किमतीचा एक शेअर प्रत्येकी २ रुपये किमतीच्या पाच शेअर्समध्ये विभागला आणि नंतर २०१९ मध्ये २ रुपये किमतीचा तो एक शेअर प्रत्येकी १ रुपये किमतीच्या दोन शेअर्समध्ये विभागला. एचडीएफसी बँकेने अलीकडेच त्यांच्या आयपीओ दरम्यान ऑफर फॉर सेल अंतर्गत त्यांच्या नॉन-बँकिंग कर्ज देणाऱ्या शाखेतील एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेसमधील १०,००० कोटींचा हिस्सा विकला आहे.