Health Issues : मैला मिश्रित पाणी सोडल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Health Issues : मैला मिश्रित पाणी सोडल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

0
Health Issues : मैला मिश्रित पाणी सोडल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात
Health Issues : मैला मिश्रित पाणी सोडल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Health Issues : नगर : सिव्हिल हडको परिसरातील ओढ्यामध्ये मैला मिश्रित पाणी सोडल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका (Health Issues) निर्माण झाला आहे. याबाबत संबंधित प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी गायकवाड कॉलनीसह स्थानिक नागरिकांनी उपायुक्त विजयकुमार मुंडे व शहर अभियंता (City Engineer) मनोज पारखे यांच्याकडे केली आहे.

नक्की वाचा : हिंदू धर्म विचाराची सत्ता महापालिकेवर बसविणार : संग्राम जगताप

नागरिकांच्या शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांची भेट घेत मांडला प्रश्न

आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या शिष्टमंडळाने महापालिकेत संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन सदरचा गंभीर प्रश्‍न मांडला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद लहामगे, राष्ट्रवादी कामगार सेलचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र भांडवलकर, कार्याध्यक्ष विशाल म्हस्के, मुकुंद पालवे, अक्षय सूर्यवंशी, विजय औटी, अशोक कर्डिले, राहुल दरेकर, शेखर शेंडे, प्रताप मारवाडी, राजेंद्र कचरे, अशोक मुळे, प्रवीण रणखांब, अमित कचरे, शिवम देवगुणे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

अवश्य वाचा : वांजोळीत दाणी वस्तीवर जबरी चोरी; चोरट्यांच्या मारहाणीत पती-पत्नी जखमी

साथीचे आजार पसरण्याचा धोका (Health Issues)

सावेडी मधील सिव्हिल हडको भारत चौक परिसरात ओढ्यामध्ये काही नागरिकांनी मैला मिश्रित पाणी सोडल्यामुळे परिसरातील सर्वच नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात साथीचे आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. सर्वत्र दुर्गंधी देखील पसरली आहे. या ओढ्याच्या जवळून पिण्याच्या पाण्याची पाइपलाईन जात असल्याने नळाद्वारे देखील दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याचा आरोप त्यांनी केला. याबाबत उपायुक्त मुंडे यांनी यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने या परिसराची पाहणी करुन उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.