NCP: विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार (Ajit Pawar) गटाला घड्याळाऐवजी दुसरे चिन्ह (Symbol) देण्यात यावे,अशी मागणी शरद पवार (Sharad Pawar) गटाने केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली आहे. आता राष्ट्रवादीच्या अजित पवार पक्षाला ‘घड्याळ’ चिन्ह वापरण्यापासून रोखण्यासाठी शरद पवार गटाने केलेल्या याचिकेवर उद्या (ता.२४) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी (Hearing) होणार आहे.
नक्की वाचा : खेड-शिवापूरमध्ये पाच कोटींची रक्कम जप्त;रोहित पवारांनी व्हिडिओ केला शेअर
न्यायमूर्ती सूर्यकांत व उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठासमोर सुनावणी (NCP)
न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होईल. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत २९ तारखेला संपणार आहे. तत्पूर्वी याबाबत निर्णय दिला जावा, अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे. पक्षाच्या दोन्ही गटांना चिन्हाच्या वापरापासून रोखण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
अवश्य वाचा : एकदिवसीय क्रिकेटमध्ये होणार बदल,सामन्यात नवा चेंडू घेण्याचा नियम बदलणार
न्यायालयात काय घडलं ? (NCP)
शरद पवार गटाच्या वकिलांनी मंगळवारी न्यायालयाला सांगितले की, याचिकेवर आज सुनावणी होणे अपेक्षित होते. मात्र खटल्यांच्या सूचीमध्ये याचा समावेश नाही. त्यावर,‘यापूर्वीच न्यायालयाने यासंदर्भात आदेश दिला होता आणि तो दोन्ही बाजूंनी मान्य करण्यात आला होता,’ असे न्यायालयाने म्हटले. मात्र अजित पवार गटाकडून आदेशाचे पालन होत नसल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला. विधानसभा निवडणुकीत अर्ज भरण्याची मुदत २९ तारखेला संपणार असल्याने याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती वकिलांमार्फत शरद पवार गटाने केली. तर आपल्या काही उमेदवारांनी याआधीच अर्ज भरल्याचा मुद्दा अजित पवार गटाने मांडला.