काेड रेड…
Heatstroke : नगर : उन्हाळी हंगामात उष्माघाताने (Heatstroke) मानव, पशू, प्राणी व शेती पिकांवर होणारे दुष्परिणाम (Side effects) टाळण्याच्या दृष्टीने शासनाच्या विभागांनी कार्यवाही करावी व उष्माघाताचे दुष्परिणाम टाळावेत, तसेच नागरिकांनीही उन्हात जाताना काळजी घ्यावी (Be careful) व सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
हे देखील वाचा: नगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी वाहतुकीत बदल; अनेक रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्ग काेणते?
स्वतःसह जनावरांचे संरक्षण हाेईल याची दक्षता घ्यावी
सर्व नागरिकांनी उष्माघाताचे लक्षणे दिसताच तत्काळ डाॅक्टरांना संपर्क साधावा. उष्मालाेटेपासून स्वतःसह जनावरांचे संरक्षण हाेईल, याबाबत याेग्य ती दक्षता घ्यावी. नागरिकांनी मदतीसाठी व आपत्कालीन परिस्थितीमध्ये १०७७, १०७०, १००, १०१, १०२, १०४, १०८ व ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी केले आहे.
नक्की वाचा: नरेंद्र माेदींकडून आराेग्य विकास प्रक्रियेशी जाेडण्याचे महत्त्वपूर्ण काम : राधाकृष्ण विखे पाटील
अशी घ्या काळजी (Heatstroke)
उन्हाळ्यामध्ये घ्यावयाची काळजी
-पुरेसे पाणी प्यावे. तहान लागली नसतानादेखील दर अर्धा तासाच्या फरकाने पाणी प्यावे.
-घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करावा.
- दुपारी बारा ते तीनदरम्यान घराबाहेर जाणे टाळावे. सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणि झडपांच्या वापर करावा.
-उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टीव्ही किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करावा.
-हलके, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.
-प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.
-अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाच्या झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
-जनावरांना छावणीत ठेवावे तसेच त्यांना पुरेसे पाणी पिण्यास द्यावे.
-सूर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करावे.
-गर्भवती आणि आजारी कामगारांची अधिक काळजी घ्यावी.
हे करू नका
- उन्हात अति कष्टाची कामे करू नका.
- दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेय घेऊ नका. दुपारी बारा ते तीनदरम्यान घराबाहेर जाणे टाळा.
-उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नका.
-लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नका.
-गडद घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळा.
-बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळा.
-उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळा, अशा प्रकारच्या सूचना जिल्हा प्रशासनाने नागरिकांना दिल्या आहेत.