Heavy Rain : नगर : जिल्ह्यात परतीच्या पावसाने (Heavy Rain) दक्षिणेतील तालुक्यांना त्याचा मोठा फटका बसला आहे. पाथर्डी, कर्जत आणि शेवगाव (Shevgaon) तालुक्यातील २९२ गावांतील १ लाख ४० हजार शेतकऱ्यांचे सुमारे १ लाख ५० हजार ६३१ हेक्टरवरील शेती पिकांचे (Agricultural Crop) नुकसान झालेले आहे.
अवश्य वाचा : बीड ते अहिल्यानगर रेल्वे सुरु; प्रवास भाडे किती? जाणून घ्या सविस्तर…
१३७ जनावरे दगावली असून चार व्यक्तींचा बळी
जिल्ह्यात राहाता आणि कोपरगाव तालुका वगळता उर्वरित १२ ठिकाणी पशूहानी, घरांची पडझड आणि मनुष्यहानी झालेली असल्याची माहिती प्रशासनाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाली आहे. यात सर्वाधिक नुकसान हे पाथर्डी तालुक्यात झाले आहे. जिल्ह्यात पशूहानीत १३७ जनावरे वेगवेगळ्या कारणामुळे दगावली असून चार व्यक्तींचा बळी गेला आहे. यासह वेगवेगळ्या तालुक्यात १५३ घरांची पडझड झालेली आहे.
नक्की वाचा: ‘त्या’ नराधमावर कठोर कारवाई करावी; आमदार भरत गोगावले यांची प्रतिक्रिया
जिल्हा कृषी विभागाकडून नुकसानीची पाहणी सुरू (Heavy Rain)
जिल्हा कृषी विभागाकडून जिल्ह्यात १३ व १४ सप्टेंबरला झालेल्या पावसामुळे नुकसानीची पाहणी सुरू करण्यात आली आहे. मात्र, सलग तीन दिवसांपासून दररोज कोसळणाऱ्या पावसामुळे नुकसानीचे पंचनामे करण्यात अडचणी येत होती. पाथर्डी तालुक्यातील ११४ गावांतील ४९ हजार ८९१ हेक्टरवरील ६९ हजार शेतकऱ्याचे, कर्जत तालुक्यातील ६५ गावांतील ८२० हेक्टरवर २ हजार १२० शेतकरी बाधित झाले आहेत. शेवगाव तालुक्यातील ११३ गावांतील ४५ हजार ५४३ शेतकरी, ३४ हजार ६१० हेक्टरवर (३३ टक्क्यांच्या आत) आणि ६९ हजार १९३ शेतकऱ्यांचे ५१ हजार ९९३ हेक्टरवरील पिकांचे या पावसाने नुकसान झाले आहे. बाजरी, कापूस, सोयाबीन, तूर, उडीद, कांदा, तूर, मका तर सीताफळ, संत्रा, डाळिंब, केळी, पपई या फळबागांचे नुकसान झाले आहे. भाजीपाला पिके भुईसपाट झालेली आहे.
या पावसात सर्वाधिक नुकसान हे पाथर्डी तालुक्यात २ व्यक्ती, ३४ मोठी जनावरे, ९३ लहान जनावरे आणि ४३ घरांची पडझड झालेली आहे. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानूसार जिल्ह्यात वीज पडून 3 जनावरे, ९७ जनावरे पुराच्या पाण्यात तर ६ जनावरे घराची भिंती अथवा घर पडून मृत्यूमुखी पडली आहेत.
नगर तालुक्यात १ व्यक्ती, १ घराची पडझड, अकोले तालुक्यात १ घर, जामखेड तालुक्यात ६ घरे, कर्जत १७ घरे, नेवासा ४ लहान जनावरे, २६ घरांची पडझड, पारनेर १ मोठे जनावर, १ लहान जनावर आणि ३ घरांची पडझड, राहुरी ११ घरांची पडझड, संगमनेर १ मोठे आणि १ लहान जनावर, २ घरांची पडझड, शेवगाव १ व्यक्तीसह ६ लहान जनावरे ३८ घरांची पडझड, श्रीगोंदा २ घरांची पडझड, श्रीरामपूर ३ घरांची पडझड झालेली आहे. अशा प्रकारे जिल्ह्यात दोन दिवसात ४ व्यक्ती, ३६ मोठी जनावरे, १०१ लहान जनावरे आणि १५३ घरांची पडझड झाली आहे.