Heavy Rain : अहिल्यानगर जिल्ह्यात २२ मंडलात अतिवृष्टी; अनेक पूल पाण्याखाली

Heavy Rain : अहिल्यानगर जिल्ह्यात २२ मंडलात अतिवृष्टी; अनेक पूल पाण्याखाली

0
Heavy Rain : अहिल्यानगर जिल्ह्यात २२ मंडलात अतिवृष्टी; अनेक पूल पाण्याखाली
Heavy Rain : अहिल्यानगर जिल्ह्यात २२ मंडलात अतिवृष्टी; अनेक पूल पाण्याखाली

Heavy Rain : नगर : भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात २२ मंडलात अतिवृष्टीची (Heavy Rain) नोंद झाली आहे. या पावसामुळे सीना नदीला (Sina River) पूर आला असून नगर-कल्याण महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

अवश्य वाचा: “मंत्री इतर कामात व्यस्त राहणार असतील तर मंत्रीपद सोडावे लागेल”-अजित पवार

पावसाने सीना नदीला पूर

गेल्या दोन -तीन दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागात पावसाचा जोर वाढला आहे. शहर आणि परिसरात रविवारी (ता. २०) दुपारी दोनच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. थोड्या फार उघडीप दिल्यानंतर सायंकाळी जोरदार पाऊस झाला. या पावसाने सीना नदीला पूर आला. अहिल्यानगर- कल्याण महामार्गावर सीनानदीच्या पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. तर काही भागात रविवार तसेच सोमवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसामुळे शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. पावसाचे हे पाणी नागरिकांच्या घरातही घुसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. नगर शहराबरोबरच नगर, कर्जत, जामखेड, पाथर्डी, श्रीगोंदा तालुक्यातील काही भागात अतिवृष्टी सारखा पाऊस झाला आहे.

नक्की वाचा : शहरातील मुस्लिम महिलांचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा

नदी, नाले, ओढे तुडूंब भरून वाहत आहेत (Heavy Rain)

जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून ढगाळ वातावरण असून अनेक ठिकाणी रिमझीम तर काही ठिकाणी मोठा पाऊस सुरु आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून मोठ्या स्वरूपाच्या पावसाला सुरूवात झाल्याने नदी, नाले, ओढे तुडूंब भरून वाहत आहेत. या पावसामुळे सोयाबीन, मका, बाजरी, कांदा तसेच कडधान्य पिकांचे नुकसान होत आहे.


शहरातील नरहरी नगर आणि गुलमोहर रोड येथील नागरिकांना मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले होते. रविवारी रात्री पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली. शहर परिसरात सर्वत्रच मुसळधार पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. रात्रभर अधून मधून पावसाचा जोर वाढत होता. शहर परिसरात तसेच जेऊर परिसरातही रात्रभर जोरदार पाऊस झाल्याने सीना नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला होता. या पुरामुळे कल्याण रोडवरील पूल पाण्याखाली गेल्याने या रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती.

मंडलनिहाय पावसाची आकडेवारी (मि.मी) –
कापूरवाडी मंडल- ७१, केडगाव -७४, भिंगार – ७२, चिचोंडी -७२, चास -७४, मांडवगण -७०, कोळगाव -७३, मिरजगाव ७८.८, जामखेड -६९, खर्डा- ७४, नान्नज -७९, साकत -७९.३, बोधेगाव-८१, चापडगाव- ८१, मुंगी- ८१.८, पाथर्डी -१२४.८, माणिकदौंडी -१२४, टाकळी-१५५, कोरडगाव -१२४, करंजी -६९, खरवंडी -१५५, अकोले १२४ या भागात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला आहे.