Heavy Rain : नगर : जिल्ह्यात शनिवारी (ता.२७) रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार (Continuous Rains) व मुसळधार पावसामुळे १२४ पैकी ८४ मंडळामध्ये अतिवृष्टी (Heavy Rain) झाली. यामुळे जिल्ह्यात सर्वत्रच पूर परिस्थिती निर्माण झाली होती. या पुराच्या पाण्यात अडकलेल्या ३ हजार ४९७ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. अनेक ठिकाणी महसूल प्रशासन (Revenue Administration), स्थानिक नागरिक व शोध-बचाव पथकांच्या मदतीने ६० नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली.
अवश्य वाचा: नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेले मंत्री केवळ फोटोसेशन करतात : थोरात
जिल्हाभर पशुधनाचे मोठे नुकसान
तर २९ दुधाळ जनावरे, १६ लहान जनावरे तसेच २ हजार ६४५ कुक्कुट पक्षी मृत झाले. १८ गोठे नष्ट झाले. ५९९ कच्च्या घरांचे अंशतः नुकसान झाले असून १ घराचे पूर्णतः नुकसान झाले. ३५५ घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले. जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील ३१३ गावांमधील २ हजार ६८ विहिरींचे नुकसान झाले आहे.
नक्की वाचा : मोठी बातमी!आता लाडक्या बहिणींना मिळणार कर्ज!
एकूण ८४ मंडळामध्ये अतिवृष्टी (Heavy Rain)
अहिल्यानगर तालुक्यातील १२ मंडळात अतिवृष्टी झाली. पारनेर ६, श्रीगोंदा २, कर्जत ४, जामखेड ७, शेवगाव ८, पाथर्डी ९, नेवासा १०, राहुरी ८, संगमनेर १, कोपरगाव ६, श्रीरामपूर ५ तर राहाता ६ अशा एकूण ८४ मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे.
महसूल प्रशासन, स्थानिक नागरिक व शोध-बचाव पथकांच्या मदतीने अहिल्यानगर तालुक्यातील ९ व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले. जामखेड तालुक्यात ४२, कर्जत ४५६, कोपरगाव २००, नेवासा ६५९, राहुरी ४९८, संगमनेर ८४, शेवगाव ७६, श्रीरामपूर ७४ तर राहाता तालुक्यातील १ हजार ३९९ व्यक्ती सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.
सीना धरणाचा विसर्ग वाढल्यामुळे कर्जत व जामखेड तालुक्यातील सीना नदीकाठच्या गावामध्ये पाणी पातळी वाढत असून ग्रामस्तरीय यंत्रणा कार्यरत आहे. आवश्यकतेनुसार नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले. अहिल्यानगर महापालिका हद्दीत पावसामुळे कल्याण रोडवरील नवीन पुलाच्या बांधकामाजवळील रस्ता पाण्याखाली गेला असून वाहतूक बंद करण्यात आली आहे. शहरातील नेप्ती नाका परिसरात सीना नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात पसरल्याने पर्यायी मार्गांचा वापर करण्यात आला होता.



