Heavy Rain : राज्यभर पावसाचा धुमाकूळ; वेळेआधीच मान्सून राज्यात दाखल

Heavy Rain : राज्यभर पावसाचा धुमाकूळ; वेळेआधीच मान्सून राज्यात दाखल

0
Heavy Rain : राज्यभर पावसाचा धुमाकूळ; वेळेआधीच मान्सून राज्यात दाखल
Heavy Rain : राज्यभर पावसाचा धुमाकूळ; वेळेआधीच मान्सून राज्यात दाखल

Heavy Rain : अहिल्यानगर : राज्यभर पावसाचे थैमान (Heavy Rain) चालू असून पावसाने सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अवकाळी पावसासह मान्सूनही (Monsoon) यंदा लवकर दाखल झाल्याने शेतकऱ्यांच्या (Farmer) भाजीपाल्यासह फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी विक्रमी पावसाची नोंद झाली आहे.

नक्की वाचा : संजय शिरसाट यांच्या मुलावर विवाहित महिलेचे गंभीर आरोप

उन्हाळी पिकाचं मोठं नुकसान

राज्यभरातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यापासून होत असलेल्या मान्सूनपूर्व पावसाच्या तडाख्यात उन्हाळी पिकाचं मोठं नुकसान झालंय. महाराष्ट्रातील अनेक भागात काढणीला आलेलं उन्हाळी ज्वारीचे पिकाच मान्सूनपूर्व पावसामुळे कणस काळवंडली असून या पांढरी शुभ्र दिसणारे ज्वारीच्या दाण्याला आता बाजारात कवडीमोल दर ही मिळणार नसल्याने शेतकरी चिंतेत सापडलाय.

अवश्य वाचा : मुंबईनंतर पुणे व सोलापूर मध्ये मान्सूनची एन्ट्री!

अनेक शहरांमधील रस्ते जलमय (Heavy Rain)

अनेक मुख्य शहरांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या तासाभरापासून पाऊस कोसळू लागला आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने शहरातील मुख्य रस्त्यावर पाणी जमा होऊ लागले आहे. यामुळे अनेक शहरांमधील रस्ते जलमय झाले असून वाहतुकीस अनेक अडचणी येत आहेत. अनेक ठिकाणी वाहतूक खोळंबल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे.