Heavy Rain Affected : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पूर्ण मदत द्या; तहसीलदारांना निवेदन

Heavy Rain Affected : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पूर्ण मदत द्या; तहसीलदारांना निवेदन

0
Heavy Rain Affected : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पूर्ण मदत द्या; तहसीलदारांना निवेदन
Heavy Rain Affected : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पूर्ण मदत द्या; तहसीलदारांना निवेदन

Heavy Rain Affected : पाथर्डी : अतिवृष्टीग्रस्त (Heavy Rain Affected) पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांचे (Farmers) प्रचंड नुकसान झाले असून, शासनाने (Government) जाहीर केलेली मदत अद्याप अपूर्ण असल्याची बाब पुढे आली आहे. यासंदर्भात तातडीने मदत वितरण व पेरणीसाठी जाहीर केलेली रक्कम अदा करण्याची मागणी करत बुधवारी (ता.२९) तहसीलदार डॉ.उद्धव नाईक यांना शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

अवश्य वाचा : ‘त्या’ दोन्ही डॉक्टरांचा जामीन अर्ज मागे

निवेदनावर या शेतकऱ्यांच्या सह्या

यावेळी या निवेदनावर शेतकरी संदीप म्हातारदेव राजळे, बाळासाहेब गर्जे, रमेश कचरे, किसन आव्हाड, गणेश भगत, दादासाहेब पवार,सुखदेव केदार, राहुल वायकर, सुनिल ढाकणे, विशाल खेडकर, ज्ञानेश्वर गोल्हार, राजेंद्र ढाकणे आदींच्या सह्या आहेत.

नक्की वाचा : सुनीता भांगरे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

निवेदनात म्हटले आहे की, (Heavy Rain Affected)

यंदाच्या अतिवृष्टीमुळे पिके, जनावरांचा चारा आणि शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. नुकताच झालेला मुसळधार पाऊस आणि बुधवारी सकाळपासून पुन्हा सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची अडचण अधिक वाढली आहे. राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत जाहीर करत दिवाळीपूर्वी ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल, असे जाहीर केले होते. परंतु प्रत्यक्षात केवळ काही मोजक्या शेतकऱ्यांच्या खात्यातच मदत जमा झाली असून बहुसंख्य शेतकऱ्यांना आजपर्यंत एकही रुपया मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे.

तसेच पेरणीसाठी प्रति हेक्टर १० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती. मात्र, ही मदतही अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. परिणामी पुढील हंगामासाठी आवश्यक असलेले बियाणे, खत आणि मजुरीसाठी निधी उपलब्ध न झाल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहेत, असे निवेदनात नमूद आहे.

शेतकऱ्यांनी तहसीलदारांना विनंती केली आहे की, तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांची यादी तपासून, ज्यांच्या खात्यात मदत जमा झालेली नाही, त्यांना ती तातडीने वितरित करावी. तसेच पेरणीसाठी जाहीर केलेली मदत सर्व पात्र शेतकऱ्यांना त्वरीत देण्यात यावी. महसूल कार्यालयाने या प्रक्रियेत पारदर्शकता ठेवावी व कोणत्याही शेतकऱ्याला अन्याय होणार नाही, याची खात्री करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न हेच त्यांच्या कुटुंबाचा जीवनाधार असल्याने शासनाने दिलेली आश्वासने प्रत्यक्षात उतरावीत, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच पाथर्डी तालुक्यात किती शेतकऱ्यांचे पंचनामे झाले, किती शेतकरी मदतीस पात्र ठरले आणि आजपर्यंत किती शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा झाली, याची संपूर्ण माहिती जाहीर करण्यात यावी, अशी मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे.