Rain Alert : राज्यात सलग दोन दिवस दमदार पावसाची शक्यता

महाराष्ट्रात (Maharashtra) आज आणि उद्या विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. कोकण,मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आज आणि उद्या मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे

0
Rain Alert : राज्यात सलग दोन दिवस दमदार पावसाची शक्यता
Rain Alert : राज्यात सलग दोन दिवस दमदार पावसाची शक्यता

नगर : मान्सूनचे देशात आगमन झालेले असताना महाराष्ट्रात (Maharashtra) आज आणि उद्या विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. कोकण,मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आज आणि उद्या मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. आयएमडीच्या (IMD) अंदाजानुसार, कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नक्की वाचा : अखेर लक्ष्मण हाकेंकडून उपोषण स्थगित

महाडमध्ये एनडीआरएफची टीम तैनात (Rain Alert)

रायगड जिल्ह्यात सकाळपासूनच मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे पेरणी केलेली शेती बहरली असून कोरडे पडलेल्या नदी-नाल्यांना पाणीच पाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतीच्या कामांना वेग येणार आहे. गेले तीन दिवस जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. रायगड, रत्नागिरीसह कोकणात पुढील दोन दिवस आणखी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे महाडमध्ये एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे.

अवश्य वाचा : आता मृदा व जलसंधारण विभागातील पदांसाठी देखील होणार फेर परीक्षा

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण खेड दापोली भागात कालपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे या भागातील नद्या पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. पावसाचा जोर वाढू लागल्यास या भागातील नद्या पात्र सोडून वाहण्याची शक्यता देखील निर्माण झालीय. मात्र सद्यस्थितीत पावसाने उसंत घेतल्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी अलर्ट मोडवर (Rain Alert)

खेडमध्ये मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीचं पाणी इशारा पातळीच्या वर पोहोचले असून यामुळे आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी अलर्ट मोडवर आहेत. सतत पडणाऱ्या पावसामुळे खेडमधील जगबुडी नदीला पूर आला आहे.पावसाचा जोर कायम राहण्यास खेड शहराच्या अगदी बाजूने वाहणारी ही नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता निर्माण झाली असून नागरिकांनी नदीकाठी विनाकारण फिरू नये, असं आवाहन स्थानिक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here