नगर : राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहेत. काही भागात जोरदार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाले आहे तर अनेक ठिकाणी अजून चांगला पाऊस झालेला नाही. यादरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार पुढचे तीन ते चार तास अत्यंत महत्वाचे आहेत. कारण राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
नक्की वाचा : धक्कादायक! तामिळनाडूत विषारी दारू प्यायल्याने २९ जणांचा मृत्यू
पुढील ३ ते ४ तासात राज्यातील विविध भागात जोरदार पावसाची शक्यता (weather Update)
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, पुढील ३ ते ४ तासात राज्यातील विविध भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये पालघर, ठाणे, रायगड आणि मुंबई जिल्ह्यांतील काही ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत पहाटेपासूनच पावसाची रिमझिम पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. मुंबईसह पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या भागात मुंबईच्या हवामान खात्यानं यलो अलर्ट जारी केलाय. विदर्भातही आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
अवश्य वाचा : माझं लाेकसभेतलं पहिलं भाषण इंग्रजीतच : नीलेश लंके
‘नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी’ (weather Update)
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, विविध भागात राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी,असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं असून पाऊस सुरु असताना बाहेर पडणे टाळावे असंही प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.
राज्यातील अनेक भागात चांगला पाऊस झाला नाही, त्या भागातील शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र जोपर्यंत चांगला पाऊस होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करु नये असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे.१०० मिलीमीटर पााऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करु नये, असं आवाहन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलं आहे.