Weather Update:राज्यात जुलैमध्ये जास्त पावसाच्या सरी;हवामान विभागाचा अंदाज

पुढील तीन दिवसांत देशाच्या उर्वरित भागात मोसमी पाऊस (Rainy Season) दाखल होईल. जुलै महिन्यात राज्यासह देशभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज (Esimate) हवामान विभागाने (Department of Meteorology) व्यक्त केला आहे.

0
Weather Update:राज्यात जुलैमध्ये जास्त पावसाच्या सरी;हवामान विभागाचा अंदाज
Weather Update:राज्यात जुलैमध्ये जास्त पावसाच्या सरी;हवामान विभागाचा अंदाज

नगर : सध्या सगळीकडे पाऊस बरसत आहे. त्यातच पुढील तीन दिवसांत देशाच्या उर्वरित भागात मोसमी पाऊस (Rainy Season) दाखल होईल. जुलै महिन्यात राज्यासह देशभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज (Esimate) हवामान विभागाने (Department of Meteorology) व्यक्त केला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत महासागरातील एल-निनो तटस्थ अवस्थेत गेलाय. तर ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत ला – निना स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. तर हिंदी महासागरातील द्वि धुव्रिता सध्या तटस्थ आहे. मोसमी पावसासाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे जुलै महिन्यात देशभरात सरासरीच्या १०६ टक्के पावसाचा अंदाज आहे. जुलै महिन्यात देशात सरासरी २८०.४ तर राज्यात सरासरी ३६२.३ मिलीमीटर पाऊस पडतो, यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे.

नक्की वाचा : भुशी डॅमच्या दुर्घटनेनंतर मोठा निर्णय;पुण्यातील धबधबे पर्यटकांसाठी बंद  

मध्य महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज (Weather Update)

राज्यात कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्या तुलनेत उत्तर महाराष्ट्रात काहीसा कमी पण, सरासरी इतका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. जुलै महिन्यांत देशासह राज्यात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. राजस्थान आणि पंजाबचा वायव्य भाग वगळता सोमवारपर्यंत (ता. १) मोसमी पावसाने देशाचा सर्व भाग व्यापला आहे. पुढील तीन दिवसांत देशाच्या उर्वरीत भागात मोसमी पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात पुढील दोन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

अवश्य वाचा : अशोक सराफ दिसणार डॉक्टरच्या भूमिकेत;’लाईफलाईन मधील व्यक्तिरेखेच्या पोस्टरचे अनावरण

कुठे किती पाऊस पडतो ? (Weather Update)

जून महिन्यात दक्षिण भारताचा अपवाद वगळता देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. जूनमध्ये देशात सरासरी १६५.३ मिमी पाऊस पडतो, प्रत्यक्षात १०.९ टक्के कमी म्हणजे १४७.२ मिलीमीटर  पाऊस झाला. दक्षिण भारतात सरासरी १६१ मिलीमीटर पाऊस पडतो, तिथे १४.२ टक्के अधिक, १८३.९ मिमी पाऊस झाला आहे. वायव्य भारतात सरासरी ७८.१ मिमी पाऊस पडतो, प्रत्यक्षात ३२.६ टक्के कमी, ५२.६ मिमी पाऊस झाला. ईशान्य भारतात ३२८.४ मिमी पाऊस पडतो.  प्रत्यक्षात १३.३ टक्के कमी, २८४.९ मिमी पाऊस पडला. मध्य भारतात १७०.३ मिमी सरासरी पाऊस पडतो, प्रत्यक्षात १३.७ टक्के कमी, १४७ मिमी पाऊस पडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here