Help for Flood Victims : पाथर्डी: तालुक्यात अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून, अनेक कुटुंबे या संकटातून अद्याप बाहेर येऊ शकलेली नाहीत. नद्यांना आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पाणीच पाणी झाले, ज्यामुळे स्थानिक रहिवाशांचे प्रचंड हाल झाले. अशा बिकट परिस्थितीत भारतीय जैन संघटना (Bharatiya Jain Sanghatana), अहिल्यानगर विभाग आणि सुसंवाद मंच, कोल्हार भगवती यांच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात (Help for Flood Victims) दिला आहे.
अवश्य वाचा : अहिल्यानगर महापालिकेचा गलथान कारभार; सहा महिन्यांपासून रस्त्याचे काम रखडले
किराणा किट व इतर साहीत्याचे वाटप
भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतिलालजी मुथ्था आणि महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वजित गुगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव, हनुमान टाकळी, करंजी, कासार पिंपळगाव आणि मोहरी या गावांमध्ये मदत कार्य राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत पूरग्रस्त कुटुंबांना किराणा किट, ब्लँकेट्स, साड्या, शर्ट, पँट, मुलांचे कपडे, स्वेटर आणि रग यांचे वाटप करण्यात आले.
कोरडगाव: ४५ कुटुंबांना किराणा किट, ब्लँकेट्स आणि साड्या.
हनुमान टाकळी: ४५ कुटुंबांना किराणा किट, ब्लँकेट्स आणि साड्या.
करंजी: ४५ कुटुंबांना किराणा किट तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी साड्या, शर्ट, पँट, रग, मुलांचे कपडे आणि स्वेटर.
कासार पिंपळगाव आणि मोहरी: १० कुटुंबांना किराणा किट, साड्या आणि ब्लँकेट्स याचे वाटप करण्यात आले.
नक्की वाचा : ओवैसींच्या सभेत महिला पदाधिकाऱ्याचा ‘जय भीम,जय शिवराय’चा नारा
मदत कार्याने पूरग्रस्तांना दिलासा (Help for Flood Victims)
अतिवृष्टी आणि पुरामुळे तालुक्यातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना, भारतीय जैन संघटनेने राबविलेल्या या मदत कार्याने पूरग्रस्तांना दिलासा मिळाला आहे. विशेषत: नदीकाठच्या गावांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना या मदतीमुळे मोठा आधार मिळाला. या उपक्रमामुळे संघटनेची सामाजिक बांधिलकी आणि मानवतावादी दृष्टिकोन पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. या मदत कार्यात भारतीय जैन संघटनेचे मनसुखलाल चोरडिया, संजय शिंगवी, आशिष रांका, संतोष लोढा, सचिन साखला, पाथर्डी येथील तालुकाध्यक्ष अमोल पटवा, विशाल कर्नावट, श्रेयस चोरडिया, सुनील कर्नावट, बाळासाहेब भंडारी, प्रेमराज भंडारी, शुभम गांधी, अभय गुगळे, अभय गांधी, सतीश मुनोत, अर्चना गुगळे, निलेश गुगळे, नितीन मुथ्था, अभिषेक गुगळे आणि सुसंवाद मंच, कोल्हार भगवती येथील जितेंद्र खर्डे उपस्थित होते. या मदत कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, पूरग्रस्तांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांची गरज असल्याचे स्थानिकांनी व्यक्त केले आहे.