Hemant Ogle : श्रीरामपूर : शहरात गेल्या दहा दिवसांपासून चालू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत अनेक छोटे मोठे व्यावसायिक तसेच सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर आले आहेत. त्यांचे तातडीने शासकीय जागेवर पुनर्वसन करा, अशी मागणी आमदार हेमंत ओगले (Hemant Ogle) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची मुंबई येथे भेट घेऊन केली आहे.
नक्की वाचा : लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी सरकारचा मोठा निर्णय
निवेदनात म्हटले आहे की,
श्रीरामपूर शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण कारवाई केल्याने अनेकांचे प्रपंच उघड्यावर आले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ते गेल्या ४० ते ५० वर्षांपासून ज्या ठिकाणी व्यवसाय करत होते, त्याच ठिकाणावर हातोडा पडल्याने व्यवसायिकांवर दैनंदिन रोजी रोटी, मुलांचे शिक्षण व वडीलधाऱ्यांचे आजारपण यांसारखे मूलभूत प्रश्न ऐरणीवर आले आहेत.
अवश्य वाचा : “भारतात नॉन-व्हेजवर बंदी घालायला पाहिजे”; अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचं मोठं वक्तव्य
मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही (Hemant Ogle)
श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीत मोठ्या प्रमाणावर शासकीय जागा उपलब्ध असून त्यामध्ये म्हाडा, शेती महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, एस टी महामंडळ, जलसंपदा विभाग तसेच नगरपरिषदेच्या अनेक जागेवर विस्थापितांचे पुनर्वसन करता येणे शक्य होईल. त्याकरिता शासनाने सकारात्मक भूमिका घेणे अत्यंत आवश्यक आहे. याकामी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता असून येणाऱ्या अर्थसंकल्पात सदरची आर्थिक तरतूद करण्यात यावी, जेणेकरून पुनर्वसन करणे सोयीचे होईल असे नमूद करण्यात आले आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत निश्चितच सकारात्मक निर्णय घेऊ, अशी ग्वाही दिल्याची माहिती आमदार हेमंत ओगले यांनी दिली.