Hemant Ogle : जिल्हा रुग्णालय दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; आमदार हेमंत ओगले यांनी वेधले लक्ष

Hemant Ogle : जिल्हा रुग्णालय दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; आमदार हेमंत ओगले यांनी वेधले लक्ष

0
Hemant Ogle : जिल्हा रुग्णालय दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; आमदार हेमंत ओगले यांनी वेधले लक्ष
Hemant Ogle : जिल्हा रुग्णालय दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; आमदार हेमंत ओगले यांनी वेधले लक्ष

Hemant Ogle : श्रीरामपूर: अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात (Civil Hospital) दिव्यांग प्रणालीचा पासवर्ड व आयडी चोरून खोटे दिव्यांग प्रमाणपत्र (Fake Disability Certificate) पन्नास हजार रुपये घेऊन खरे दिव्यांग यांना डावलून चुकीच्या लोकांना प्रमाणपत्र वाटले गेले आहे. या गंभीर प्रकाराबाबत आमदार हेमंत ओगले (Hemant Ogle) यांनी नागपूर येथे चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान (Maharashtra Assembly Winter Session) मुद्दा उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले आहे.

अवश्य वाचा: नाशिक-पुणे रेल्वे संगमनेर मार्गेच व्हावी: खासदार भाऊसाहेब वाकचौरे

शासनाची फसवणूक करून दिव्यांग प्रमाणपत्र वितरित (Hemant Ogle)

यावर शासनाकडून मंत्री अतुल सावे यांनी उत्तर देताना म्हटले की, सदरचा प्रकार हा गंभीर असून, याबाबत सखोल चौकशी करून संबंधितांवर तातडीने कारवाई करण्यात येईल. नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शासनाची फसवणूक करून दिव्यांग प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहे. यामध्ये अनेकांनी दिव्यांग प्रमाणपत्राचा दुरुपयोग करून शासकीय सेवेचा लाभ घेतला आहे. या गंभीर विषयाबाबत आमदार हेमंत ओगले यांनी नागपूर येथे चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मुद्दा उपस्थित करत शासनाचे लक्ष वेधले आहे.