Heramb Kulkarni : नगर : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी (Election) २६ जूनला मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीत शिक्षकच मतदान करणार असल्याने उमेदवारांकडून आता शिक्षकांसह त्यांच्या कुटुंबीयांना प्रलोभनं दिली जात आहे. शिक्षकांना सफारी कापड तसेच घरच्यांसाठी पैठणी व सोन्याची नथ अशी प्रलोभनं दिली जात आहेत. यावर आता सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी (Heramb Kulkarni) यांनी आक्षेप घेतला आहे. शिक्षक मतदार संघात (Teachers Constituency) शिक्षकांना वस्तू वाटप होत असल्याबाबतची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
नक्की वाचा : ‘मनोज जरांगेंचा अभ्यास कमी,मुस्लिम समाजाला २५ वर्षांपूर्वीच ओबीसीतून आरक्षण’- छगन भूजबळ
निवडणूक आयोगाकडे तक्रार
शिक्षकांबरोबरच राजकीय उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्याने याला कुठेतरी पक्षीय वळण प्राप्त झाले आहे. या निवडणुकीत शिक्षकांचे मते आपल्याला कसे मिळतील, यासाठी उमेदवारांकडून आता संबंधितांना प्रलोभने दिली जात आहे, अशी प्रलोभना देणं चुकीचे आहे, असे देखील काही उमेदवार म्हणत आहेत. आता याच प्रकरणी असलेले हेरंब कुलकर्णी यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. पत्रामध्ये त्यांनी म्हटले की, नाशिक शिक्षक मतदार संघात सध्या निवडणूक सुरू आहे.
अवश्य वाचा : गुडन्यूज! जूनमधील मान्सून आता जुलैमध्ये बरसणार
शिक्षकांना सफारीचे कापड, महिलांना पैठणी वाटप (Heramb Kulkarni)
मागील निवडणुकीत या मतदारसंघात शिक्षकांना पैठणी वाटप झाल्याचे तक्रार नोंदवली होती. मात्र, कारवाई झाली नाही. यंदा देखील तोच प्रकार सुरू असून शिक्षकांना सफारीचे कापड, महिलांना पैठणी दिल्या जात असल्याच्या वृत्तपत्रांमध्ये बातम्या येत आहे. याच बातमीच्या आधारे आपण तातडीने चौकशी करावी. धक्कादायक बाब म्हणजे उमेदवारांकडून थेट शाळेमध्ये जाऊन शाळेच्या वेळेतच या भेटवस्तू दिल्या जात आहेत, अशी देखील चर्चा आहे. शाळेत जाऊन या भेटवस्तू देण्यात येत आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी शाळांना भेट द्यावी व त्याचबरोबर सर्व मुख्याध्यापक यांना याबाबत शाळेत असे प्रकार घडल्यास त्यांनाही जबाबदार धरले जाईल, असे निर्देश द्यावे, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.