Heramb Kulkarni : नगर : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी (Heramb Kulkarni) यांनी शाळेच्या परिसरात तंबाखू जन्य पदार्थ विक्रीला विरोध केला होता. त्यामुळे त्यांच्यावर मागील वर्षी अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरातील सावेडी उपनगरात प्राणघातक हल्ला झाला होता. या हल्ल्याचा विधानसभा (Assembly) व विधान परिषदेत (Legislative Council) आमदारांनी निषेध करत ठोस कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार राज्याच्या शिक्षण विभागाने काल (ता. १४) नियमावली प्रसिद्ध करत शाळेच्या परिसरात एक किलोमीटरमध्ये तंबाखू जन्य पदार्थ विकले जाणाऱ्या पान टपऱ्या नसाव्यात, असे आदेशित केले आहे. या निर्णयाचे हेरंब कुलकर्णी यांनी स्वागत केले आहे. ते म्हणाले, दीड वर्षापूर्वी मी शाळेच्या शेजारी असलेली पानटपरी हटवली म्हणून माझ्यावर सुपारी देऊन प्राणघातक हल्ला झाला होता. आज माझे सांडलेले रक्त कारणी लागले, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
नक्की वाचा : राज्यातील देवस्थानच्या जमिनींच्या खरेदी विक्री बंद; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
हेरंब कुलकर्णी म्हणाले की,
फक्त याची अंमलबजावणी करताना शाळेच्या मुख्याध्यापक यांच्यावर जबाबदारी टाकताना त्या गावातील ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपंचायत महापालिका व पोलीस यांच्यावर ही जबाबदारी निश्चित करण्याची गरज आहे. किंबहुना १५ जूनला शाळा सुरू होण्यापूर्वी प्रशासनाने शाळेभोवती असणाऱ्या या सर्व टपऱ्या काढून द्याव्यात. त्यासोबतच आज लहान मुलांसाठी बनवलेली एनर्जी ड्रिंक ही अतिशय घातक आहेत. त्यात येणारी उत्तेजना आणणारी द्रव्य ही अतिशय घातक घटक असतात.ते मुलांना अंमली पदार्थांकडे नेतात. त्यामुळे शाळेच्या परिसरात ती एनर्जी ड्रिंक विकली जाणार नाहीत, असाही नियम हवा. राज्य सरकारने या द्रव्यांची तपासणी करून त्यावर बंदी घालावी, असे त्यांनी सांगितले.
अवश्य वाचा : राज्यात लाडक्या बहिणींच्या नावे शेकडो बनावट खाती,प्रकरण नेमकं काय ?
शाळांनी विद्यार्थ्यांच्या दप्तर, खिसे तपासण्याची गरज (Heramb Kulkarni)
त्याचबरोबर पालकांनी विद्यार्थ्यांना पैसे देऊ नयेत व शाळांनी विद्यार्थ्यांच्या दप्तर, खिसे तपासण्याची गरज आहे कारण मध्यंतरी नाशिक जिल्ह्यात एका शाळेत विद्यार्थ्यांच्या दप्तरात कंडोम पासून मारामारीची हत्यारे ही सापडली होती, असा सल्लाही हेरंब कुलकर्णी यांनी दिला.