Hind Di Chadar : नांदेड येथील ऐतिहासिक ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून अनुयायांची उपस्थिती

Hind Di Chadar : नांदेड येथील ऐतिहासिक ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून अनुयायांची उपस्थिती

0

Hind Di Chadar : नगर: ‘हिंद-दी-चादर’ (Hind Di Chadar) श्री गुरु तेग बहादुर साहिबजी (Sri Guru Tegh Bahadur Sahib Ji) यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी आयोजित भव्य कार्यक्रमासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून शीख, बंजारा, सिंधी व इतर समाजातील अनुयायी उपस्थित राहणार आहेत. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून भाविकांच्या सोयीसाठी चोख नियोजन करण्यात आले आहे.

नक्की वाचा: मोठी बातमी!राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या

नांदेड येथे मुख्य सोहळा पार पडणार

नांदेड येथील मोदी मैदान येथे हा मुख्य सोहळा पार पडणार आहे. राज्य शासनाचा अल्पसंख्याक विकास विभाग, राज्यस्तरीय समिती आणि विविध समाज बांधवांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

अवश्य वाचा : ‘साकळाई पाणी योजनेच्या कामाची सुरवात करून गावांना दुष्काळमुक्त करणार;राधाकृष्ण विखे पाटील

कार्यक्रमाच्या नियोजनासाठी २५ समित्यांची स्थापना (Hind Di Chadar)

राज्याचे मुख्यमंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्हा प्रशासनाने या सोहळ्याची व्यापक तयारी केली आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी २५ विविध समित्यांची स्थापना करण्यात आली असून, बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांसाठी निवास, भोजन, आरोग्य व वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यात आली आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाविकांसाठी शाळा, महाविद्यालये व मोकळ्या जागांवर निवासाची सोय करण्यात आली असून, वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी विशेष वाहनतळ (पार्किंग) व्यवस्था उभारण्यात आली आहे.

या सोहळ्याचे महत्त्व लक्षात घेऊन, श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या त्याग व बलिदानाचा इतिहास जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांनी व अनुयायांनी या ऐतिहासिक कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.