
Hindi Romantic Songs : नगर : सहज फौंडेशन, रोटरी क्लब अ. नगर मिडटाऊन (Rotary Club Of Ahmednagar Midtown) तसेच आर्किटेक्ट इंजिनियर अँड सर्वेअर असोसिएशन यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या ‘रोमान्स ऑफ इंडियन सिनेमा भाग 4’ या हिंदी रोमँटिक गाण्यांचा (Hindi Romantic Songs) कार्यक्रम दि 26 ऑक्टोबर रविवारी सायंकाळी 6:00 वा. माऊली सभागृह सावेडी येथे होणार असून, हा कार्यक्रम दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हिंदी प्रेम युगल गीते यावर आधारित आहे.
अवश्य वाचा : हातावर सुसाईड नोट लिहित महिला डॉक्टरची आत्महत्या; प्रकरण नेमकं काय ?
कार्यक्रम विनामूल्य असून रसिकांसाठी मोठी पर्वणी
या तीनही संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम दरवर्षी राबवले जातात आणि त्याच उपक्रमाचा भाग म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. हा कार्यक्रम विनामूल्य असून रसिकांसाठी मोठी पर्वणी असणार आहे. तरी नगरच्या रसिका प्रेक्षकांना विनंती आहे की आपण या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन रोटरी चे अध्यक्ष रो डॉ विनोद मोरे, सेक्रेटरी महेश गोपालकृष्णन यांनी केले.
नक्की वाचा : हद्दीबाहेरील मतदारांचा समावेश होऊ नये यासाठी दक्षता घ्यावी : आयुक्त डांगे
या कार्यक्रमाचे हे चौथे वर्ष (Hindi Romantic Songs)
दिवाळी आनंदाचा उत्सव आहे. सहज फौंडेशन नेहमी सांस्कृतिक बरोबरच सामाजिक उमक्रमात नेहमी सहभागी असते. संस्थेचे अध्यक्ष अशोक अकोलकर आणि उपाध्यक्ष तुषार देशमुख प्रयत्नशील असतात. आर्किटेक्ट इंजिनिअर अँड सर्वेयर यांचाही सहभाग सामाजिक कार्यक्रमात असतो. रसिक प्रेकांना बक्षीस जि कण्याची संधी आहे असे प्रतिपादन अभिजित देवी, अध्यक्ष व सचिव भूषण पांडव यांनी केले.
या कार्यक्रमात गायक : आदेश चव्हाण, सागर मेहेत्रे, क्षितिज झावरे, जालिंदर शिंदे, भाग्यश्री डुंबरे, कोमल सावंत, नाना वाबळे
सहगायक : पूनम कदम वादक: संगीत संयोजन: निलेश सोज्वळ, एडविन पेरेपाडम दिलावर शेख, सिद्धांत गायकवाड, सोनू साळवे, अमित बुरवा असणार आहेत. तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन देवाशिष शेडगे हे करणार आहेत.
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून कालिका स्टील चे डायरेक्टर मा. अरुण अग्रवाल हे उपस्तिथ राहणार आहेत. रामदास सुलाखे, तुषार अंबाडे, आदित्य ठोंबे, डॉ प्रकाश रसाळ, नितीन शेळके, डिझाइनर किरण गवते, फोटोग्राफर अभिषेक शेलार, धनेश खत्ती, भूषण ओस्तवाल, महेश घावटे, राकेश
देवगुणे, अभिजित कोल्हारे, तुषार चोरडिया, यांची उपस्थित असणार आहे.


