Hindu Muslim conversion | नगर : मुस्लिम धर्मातून हिंदू धर्मात (Hindu Muslim conversion) सात महिन्यांपूर्वी प्रवेश केलेल्या शिवराम आर्य (पूर्वाश्रमीचे जमीर शेख) यांच्या मुलीला गंभीर आजार झाला. त्यांना मुलीच्या वैद्यकीय उपचारासाठी पुरेशी आर्थिक मदत मिळेना. त्यामुळे पुन्हा मुस्लिम (Muslim Religion) धर्मात प्रवेश करून नातेवाईकांकडून मदत मिळविण्याची इच्छा व्यक्त त्यांनी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवराम आर्य यांच्या मुलीसाठी २४ तासांत दोन लाखांची मदत जाहीर केली आहे.
अवश्य वाचा : मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; उपचार घेण्यास नकार
आर्थिक मदतीची आवश्यकता (Hindu Muslim conversion)
शिवराम आर्य यांच्या लहान मुलीला मेंदूत गाठ निर्माण झाली आहे. तिच्या इलाजासाठी मोठा आर्थिक खर्च येणार आहे. शिवराम आर्य यांनी हिंदू धर्मात प्रवेश केल्याने त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्याशी संबंध तोडला आहे. त्यामुळे मुलीच्या वैद्यकीय खर्चासाठी नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळत नाही. शासकीय कागदपत्रांतील नावांत बदल नसल्याने कर्ज मिळविणेही त्यांना कठीण झाले आहे. शिवराम आर्य यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. अशा स्थितीत मुलीचा वैद्यकीय खर्च करता येत नसल्याने निराश झालेल्या शिवराम आर्य यांनी निराश होत; पुन्हा मुस्लिम धर्मात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती. शिवराम आर्य यांनी सात महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे बागेश्वर धाम यांच्या कार्यक्रमात सहकुटुंब हिंदू धर्मात प्रवेश केला होता. हे धर्मांतर राज्यभर गाजले होते.
हेही वाचा : हिंदू धर्मात प्रवेश केलेला शिवराम आर्य पुन्हा मुस्लिम धर्म स्वीकारणार; आर्थिक अडचणीमुळे निर्णय
धनंजय जाधव व मंगेश चिवटेंनी मिळवून दिली मदत (Hindu Muslim conversion)
शिवराम आर्य यांची बातमी प्रसार माध्यमांतून येताच भाजपचे स्थानिक नेते धनंजय जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वयीय सहायक मंगेश चिवटे यांच्याशी संपर्क केला. चिवटे यांनी या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून मुख्यमंत्री शिंदे यांना या प्रकरणाविषयी सांगितले. त्यानुसार मुख्यमंत्री शिंदे यांनी आज मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून शिवराम आर्य यांच्या बँक खात्यात निधी वर्ग करण्याचे लिखित आदेश दिले आहेत. त्यामुळे शिवराम आर्य यांना त्यांच्या मुलीच्या वैद्यकीय खर्चासाठी आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे.